शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

३ कोटी रुपयांची थकबाकी : अकोल्याचा पाणीपुरवठा बंद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 12:08 IST

महापालिकेने थकीत रक्कम न भरल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शहराला काटेपूर्णा प्रकल्पातून (महान धरण) केला जाणारा पाणीपुरवठा पाटबंधारे विभागाने सोमवारी दुपारी १२ वाजतापासून बंद केला. महापालिका प्रशासनाने पाणीपुरवठ्याचे थकीत ३ कोटी ५५ लक्ष रुपये तातडीने जमा न केल्यास संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा खंडित करण्याची नोटीस ३ फेब्रुवारी रोजी पाटबंधारे विभागाने मनपाला जारी केली होती. त्यानंतरही महापालिकेने थकीत रक्कम न भरल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, सोमवारी संध्याकाळी महापालिकेने ४७ लाख ७४ हजार १७ रुपयांचा धनादेश पाटबंधारे विभागाकडे पाठविला आहे.काटेपूर्णा प्रकल्पात अकोला शहरवासीयांसाठी २४ दलघमी पाणी आरक्षित आहे. पाणीपुरवठ्याच्या बदल्यात मनपा प्रशासनाला पाटबंधारे विभागाकडे शुल्क जमा करणे भाग आहे. मनपाक डून सदर शुल्क जमा होत नसल्याचे पाहून २ फेब्रुवारी रोजी पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी मनपाला नोटीस जारी केली. यामध्ये ३ कोटी ५५ लक्ष ८५ हजार रुपयांची थकबाकी सात दिवसांत जमा करण्याची सूचना केली होती. थकीत रक्कम जमा न केल्यास शहराचा पाणीपुरवठा बंद करणार असल्याचे या विभागाने नमूद केले होते तसेच पाणीपुरवठा बंद झाल्यास शहरात उद्भवणाऱ्या परिस्थितीला महापालिका जबाबदार राहील, असा सूचक इशारा देण्यात आला आहे. महापालिकेने या नोटीसला गांभीर्याने घेतले नाही व मुदत संपण्याची वाट पाहिली. त्यामुळे सोमवारी १० फेब्रुवारी रोजी महापालिकेचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. विशेष म्हणजे महापालिकेकडे थकीत असलेल्या ३ कोटी ५५ लक्ष ८५ हजार रुपयांची थकबाकी निरंक होईपर्यंत पाणी पुरवठा सुरू करण्यात येणार नाही, अशी ताकीद महापलिकेला पाटबंधारे विभागाने दिली आहे.महापलिकेने सोमवारी संध्याकाळी ४७ लाखांचा धनादेश पाटबंधारे विभागाकडे दिला आहे. उर्वरित रक्कमही टप्याटप्याने भरल्या जाईल.- संजय कापडनिस, आयुक्त, महापलिका

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिकाwater transportजलवाहतूक