शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

पाणी पुरवठय़ासाठी २८३ कोटी!

By admin | Updated: August 3, 2016 02:16 IST

अकोला जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचा पुढाकार; पाणीपुरवठा मंत्र्यांकडे सोपवला प्रस्ताव.

अकोला: अमृत योजनेंतर्गत शहराच्या पाणीपुरवठा वितरण प्रणालीत सुधारणा करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने २११ कोटींचा निधी मंजूर केला. यादरम्यान, महापालिकेची संभाव्य हद्दवाढ लक्षात घेऊन आमदार गोवर्धन शर्मा, आ.रणधीर सावरकर तसेच स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणला सुधारित डीपीआरतयार करण्याचे निर्देश देत मंगळवारी तब्बल २८३ कोटींचा नवीन प्रस्ताव पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांना सादर केला. केंद्र शासनाच्या ह्यअमृतह्णयोजनेंतर्गत अकोला शहराची निवड करण्यात आली. सद्यस्थितीत खिळखिळी झालेली पाणीपुरवठा योजना सुरळीत करणे व त्यानंतर सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी भूमिगत गटार योजना कार्यान्वित करण्यासाठी ह्यअमृतह्णअंतर्गत निधी मंजूर करण्यात आला. पहिल्या टप्प्यात पाणीपुरवठा वितरण प्रणालीची कामे करणे बंधनकारक असल्यामुळे २११ कोटींच्या निधीला मंजुरी देण्यात आली. तसेच पाणीपुरवठा योजनेचा ह्यडीपीआरह्ण(प्रकल्प अहवाल) तयार करण्याचे निर्देश महाराष्ट्र जीवन प्राधिकरणला दिले. त्यानुसार मजिप्राने प्रकल्प अहवाल तयार करण्याला सुरुवात केली. यादरम्यान, महापालिकेच्या हद्दवाढीसाठी शासनस्तरावर हालचाली सुरू झाल्या. हद्दवाढीची अधिसूचना कोणत्याही क्षणी जारी होऊ शकते. त्यामुळे संभाव्य हद्दवाढ लक्षात घेऊन मनपात समाविष्ट होणार्‍या २४ गावांमधील पाणीपुरवठय़ाचाही प्रकल्प अहवालामध्ये समावेश करण्याचे निर्देश आमदार गोवर्धन शर्मा, आ.रणधीर सावरकर तसेच स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांनी मजिप्राला दिले. लोकप्रतिनिधींच्या सूचनेवरून मजिप्राने २८३ कोटींचा सुधारित प्रस्ताव तयार करून शासनाकडे सादर केला. त्या पृष्ठभूमिवर मंगळवारी आ.शर्मा, आ.सावरकर व सभापती अग्रवाल यांनी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांची भेट घेऊन सुधारित प्रस्तावाचे निवेदन दिले.