शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

२७५ ग्रामपंचायतींची प्रभाग रचना जाहीर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 01:55 IST

अकोला : पाच वर्षांचा कालावधी संपणार्‍या जिल्हय़ातील २७५ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी ग्रामपंचायतींची प्रभाग रचना आणि आरक्षण गुरुवार, ३ ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात आले. जिल्हाधिकार्‍यांच्या मान्यतेनंतर ग्रामपंचायतींची प्रभाग रचना व आरक्षण जाहीर करण्यात आले.

ठळक मुद्देजिल्हाधिकार्‍यांनी दिली मान्यतातहसील, ग्रा.प.मध्ये प्रभाग रचना प्रसिद्ध!

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : पाच वर्षांचा कालावधी संपणार्‍या जिल्हय़ातील २७५ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी ग्रामपंचायतींची प्रभाग रचना आणि आरक्षण गुरुवार, ३ ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात आले. जिल्हाधिकार्‍यांच्या मान्यतेनंतर ग्रामपंचायतींची प्रभाग रचना व आरक्षण जाहीर करण्यात आले.येत्या ऑक्टोबर ते फेब्रुवारी २0१८ या कालावधीत पाच वर्षांंचा कालावधी संपणार्‍या जिल्हय़ातील सातही तालुक्यांतील २७५ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका घेण्यात येणार आहेत. त्यानुषंगाने जिल्हय़ातील २७५ ग्रामपंचायतींची प्रभाग रचना आणि अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (ओबीसी), सर्वसाधारण प्रवर्ग आणि ५0 टक्के महिला आरक्षणाचे प्रारूप गत जुलैमध्ये जिल्हय़ातील सातही तहसील कार्यालयांमार्फत निश्‍चित करण्यात आले होते. प्रभाग रचना आणि आरक्षणाच्या प्रारूपावरील आक्षेपांवर संबंधित उपविभागीय अधिकार्‍यांकडे सुनावणीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.  त्यानंतर जिल्हय़ातील २७५ ग्रामपंचायतींची अंतिम प्रभाग रचना आणि आरक्षणाच्या प्रस्तावाला जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांच्याकडून मान्यता देण्यात आल्यानंतर ३ ऑगस्ट रोजी ग्रामपंचायतींची प्रभाग रचना आणि आरक्षण जाहीर करण्यात आले.

तहसील, ग्रा.प.मध्ये प्रभाग रचना प्रसिद्ध!जाहीर करण्यात आलेली २७५ ग्रामपंचायतींची अंतिम प्रभाग रचना आणि आरक्षण जिल्हय़ातील सातही तहसील कार्यालयांसह संबंधित ग्रामपंचायतींच्या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आले आहे.