शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
2
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
3
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
4
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
5
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
6
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
7
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
8
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
9
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
10
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
11
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
12
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
13
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
14
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
15
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
16
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
17
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
18
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
19
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
20
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती

२१ कोटी परत जाण्याचा २७१९ लाभार्थींना फटका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 00:49 IST

जिल्हा शेतकरी आत्महत्यांनी बेजार असताना,  त्या शेतकर्‍यांना सिंचन विहीर योजनेच्या माध्यमातून सबळ  करण्याची संधीही जिल्ह्याने गमावली आहे. जिल्ह्यातील  २७१५ शेतकर्‍यांच्या विहिरीचे २१ कोटी २५ लाख रुपये  शासनाकडे परत गेले. या प्रकाराची जिल्हा परिषदेचे  सत्ताधारी तर सोडाच प्रशासनानेही कोणतीच दखल घेतली  नाही. हा निधी परत जाण्यास कोण जबाबदार, त्याची कारणे  शोधण्याचाही साधा प्रयत्न झालेला नाही. त्यामुळे  विकासाच्या नावाने नुसती बोंबाबोंब सुरू असल्याचेच चित्र  दिसून येत आहे.

ठळक मुद्देजिल्हा परिषद प्रशासनाला ना खंत, ना दखल!रूपांतरानंतरच्या विहिरी अपूर्णनियोजनांचा बोजवारा

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्हा शेतकरी आत्महत्यांनी बेजार असताना,  त्या शेतकर्‍यांना सिंचन विहीर योजनेच्या माध्यमातून सबळ  करण्याची संधीही जिल्ह्याने गमावली आहे. जिल्ह्यातील  २७१५ शेतकर्‍यांच्या विहिरीचे २१ कोटी २५ लाख रुपये  शासनाकडे परत गेले. या प्रकाराची जिल्हा परिषदेचे  सत्ताधारी तर सोडाच प्रशासनानेही कोणतीच दखल घेतली  नाही. हा निधी परत जाण्यास कोण जबाबदार, त्याची कारणे  शोधण्याचाही साधा प्रयत्न झालेला नाही. त्यामुळे  विकासाच्या नावाने नुसती बोंबाबोंब सुरू असल्याचेच चित्र  दिसून येत आहे. राज्य शासनाने जिल्हा परिषद, महापालिका, नगर  परिषदांमध्ये ३0 जून २0१७ रोजी शिल्लक असलेला  विकास कामांचा निधी परत घेतला आहे. अकोला जिल्हा  परिषदेतून विविध योजनांचे जवळपास ६९ कोटी रुपये परत  जात आहेत. त्यामध्ये सर्वाधिक निधी धडक सिंचन  विहिरींचा आहे. ती रक्कम २१ कोटी २५ लाख ६१२४१  एवढी आहे. त्यातून जिल्ह्यातील २७१५ लाभार्थींंच्या शेतात  विहिरींची निर्मिती झाली असती. कायम सिंचनाची सोय उ पलब्ध झाल्याने शेतकर्‍याला मोठा आधार मिळण्याची  आशा होती. मात्र, त्याचवेळी यंत्रणांची उदासीनता आणि शासनाच्या  धोरणाचा फटका जिल्ह्यातील लाभार्थी शेतकर्‍यांना बसला  आहे. विशेष म्हणजे, त्यातही अकोला, तेल्हारा तालुक्या तील २२३ विहिरींच्या लाभार्थीना कायमस्वरूपी वंचित  ठेवण्याचा प्रकारही घडला आहे. 

रूपांतरानंतरच्या विहिरी अपूर्णजिल्ह्यात एकूण मंजूर ७४७३ विहिरींपैकी ३२६९ विहिरी २३  जानेवारी २0१४ रोजी पूर्ण झाल्या. त्यानंतर उर्वरित विहिरींचा  लाभ नरेगा आणि सिंचन विहीर योजनेतून देण्यात आला.  धडकमध्ये ३१५ पैकी २७६ पूर्ण, तर नरेगामध्ये ११८८ पैकी  ८१७ पूर्ण झाल्या. सोबतच त्यानंतर पुनर्जीवित केलेल्या  ६६२ पैकी १६२ पूर्ण झाल्या. ही आकडेवारी पाहता मंजूर  विहिरींपैकी ४७५४ विहिरी पूर्ण झाल्याची माहिती आहे. त्या पैकी किती विहिरींतून सिंचन सुरू झाले, ही बाब वेगळी. 

निधी परत जाण्यामध्ये रद्द विहिरींचा समावेशशासनाकडे निधी परत जाण्यामध्ये रद्द झालेल्या विहिरींच्या  खर्चाची रक्कम आहे. त्यामध्ये १३९८ लाभार्थींनी अग्रिम घे तला नाही, कामही सुरू केले नाही, तर १३२१ लाभार्थींंनी  अग्रिम रक्कम घेतली मात्र, काम सुरू केले नाही. त्यांचा २१  कोटी २५ लाख रुपये निधी शासनजमा केला जात आहे. हा  निधी परत जाण्याबाबत जिल्हा परिषद प्रशासन,  सत्ताधार्‍यांनी अवाक्षरही काढले नाही, हे विशेष.