आकोट (अकोला) : स्थानिक विकासनगरातील एका घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने २६ हजारांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना १७ ऑक्टोबरच्या रात्री घडली. पोलिस सूत्रानुसार, विकासनगरातील सुरेखा रमेश ओईंबे यांनी आकोट शहर पो.स्टे.ला दिलेल्या तक्रारीत, १७ ऑक्टोबरच्या रात्री घरातील मंडळी दुसर्या खोलीत झोपली होती. त्यावेळी अज्ञात चोरट्याने दरवाजाचा कडीकोंडा तोडून घरात प्रवेश केला. पर्समधून कपाटाची चावी घेतली. त्या चावीने कपाट उघडून त्यातील ५ ग्रॅम वजनाचे काना तील सोन्याचे टॉप्स् किंमत १४ हजार रुपये, हार्मोनियम पेटी किंमत १२ हजार रुपये तसेच रोख ८0 रुपये, असा एकूण २६ हजार ८0 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. या तक्रारीवरून आकोट पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भादंविच्या ४५७, ३८0 कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
आकोट शहरात २६ हजारांची चोरी
By admin | Updated: October 21, 2014 00:19 IST