शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
3
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
7
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
8
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
9
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
10
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
11
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
12
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
13
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
14
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
15
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
16
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
17
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
18
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
19
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
20
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

स्वयंरोजगारातून २६ लाख युवकांना रोजगार!

By admin | Updated: October 14, 2016 02:29 IST

राज्यात दोन लाख सूक्ष्म, माध्यम आणि लघू उद्योग

बुलडाणा, दि. १३- वस्तुनिर्माण आणि सेवा पुरविणार्‍या उद्योगाच्या आधारे राज्यातील अनेक बेरोजगार युवकांनी आज स्वत:साठी रोजगाराची निर्मिती केली आहे. राज्यात असे २ लाख ११ हजार सूक्ष्म, मध्यम आणि लघू उद्योग कार्यरत असून यातून २६ लाख ९५ हजार युवकांना रोजगार मिळाला आहे.सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योजकांना केंद्र सरकारकडून विशिष्ट प्रोत्साहन दिले जाते आहे. यासाठी शासनाच्या सूक्ष्म,लघू आणि मध्यम उद्योग विभागाकडून विविध योजना राबविल्या जातात. केंद्र व राज्य शासनाच्यावतीने ग्रामीण व शहरी भागातील गरजू व सुशिक्षित बेरोजगारांसाठी उद्योग केंद्रच्या माध्यमातून लघू उद्योग सुरू करण्याची संधी उपलब्ध करून दिली जात आहे. वस्तू निर्माण आणि सेवा पुरविणार्‍या उपक्रमात वस्तू निर्माण उद्योग आणि सेवा पुरविणारे उद्योग यात सूक्ष्म, लघू व माध्यम असे वर्गीकरण करण्यात आले आहे. यात आरोग्य, शिक्षण, अर्थकारण, क्रीडा, अन्न, गृह उद्योग, खादी ग्रामोद्योग, दुग्ध व्यवसाय, अभियांत्रिकी, कृषी, गृहनिर्माण आदी क्षेत्रातील मोठय़ा प्रमाणात रोजगार निर्मिती करून या तरुणांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली. आठ वर्षात गुंतवणूक व रोजगार वाढला!सूक्ष्म, लघू व माध्यम उपक्रम चौथी गणना २00६-0७ अनुसार राज्यात ३१ मार्च २00७ रोजी एकूण ८६,६६५ उद्योग कार्यरत होते. त्यामधील गुंतवणूक १४,८५९ कोटी होती तसेच १0.९५ लाख रोजगार होता; मात्र गेल्या सात वर्षात यात मोठय़ा प्रमाणात रोजगार निर्मिती झाली. २0१५-१६ या आर्थिक वर्षात ५0,६३७ कोटी गुंतवणुकीचे २,११,४0३ सूक्ष्म, लघू व माध्यम उपक्रम कार्यरत असून त्यामधून २६.९५ लाख रोजगार निर्माण झाला आहे.रोजगारासाठी जॉब पोर्टलसूक्ष्म, लघू व मध्यम उद्योगांतून (एमएसएमई) रोजगार मिळवू इच्छिणार्‍यासाठी केंद्र सरकारने ६६६.ी७.ूिे२ेी.ॅ५.्रल्ल हे स्वतंत्र जॉब पोर्टल सुरू केले. याचा फायदा राज्यातील बेरोजगारांना होणार आहे. याशिवाय नव्याने नोकरी व रोजगार शोधात असणार्‍या तरुणांनाही याचा लाभ होणार आहे. एमएसएमई क्षेत्राला कुशल मनुष्यबळ मिळवण्यासाठी याचा उपयोग होणार आहे. विभागानुसार उद्योग व रोजगाराचा आलेख (२0१६)विभाग               उद्योग                रोजगारमुंबई                 २१८९५                ३.६६कोकण              ३४६१३                 ५.८४नाशिक              २४२७९                 २.९७पुणे                    ८३0३३                ९.४२औरंगाबाद          १४८५९                १.७0अमरावती           १0६४२                १.0१नागपूर                २२0८२                २.३५एकूण                 २११४0३              २६.९५