शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

उड्डाण पुलासाठी बजेटमध्ये २५ कोटीची तरतूद

By admin | Updated: July 2, 2014 00:32 IST

शहरातील राष्ट्रीय महामार्ग क्रं. ६ वरील उड्डानपूल व त्यावरुन टी आकाराच्या रेल्वे उड्डान पुलासाठी येत्या बजेटमध्ये २५ कोटी रु. ची तरतुद

नांदुरा : नांदुरा ते जळगाव रोडवरील रेल्वे गेट वर प्रस्तावित नांदुरा शहरातील राष्ट्रीय महामार्ग क्रं. ६ वरील विश्रामगृह ते हनुमान मुर्ती पर्यंंत उड्डानपूल व त्यावरुन टी आकाराच्या रेल्वे उड्डान पुलासाठी येत्या बजेटमध्ये २५ कोटी रु. ची तरतुद करण्याचे आदेश भूतल परिवहन तथा ग्रामविकास मंत्री नितीन गडकरी यांनी आमदार चैनसुख संचेती यांच्या सोबत झालेल्या चर्चेनंतर संबंधित अधिकार्‍यांना दिल्याने प्रस्तावित रेल्वे उड्डान पुलाच्या कामाला आता गती मिळणार आहे.नांदुरा ते जळगाव जामोद रस्त्यावरील रेल्वे गेट रेल्वेची वाहतूक वाढल्याने दिवसभरात अनेकवेळा १५ ते २0 मिनीट रेल्वेगेट बंद राहते. त्यामुळे रेल्वे गेटच्या दोन्ही बाजूने शेकडो प्रवाशी ताटकळत उभे असतात. वाहतूकीचाही खोळंबा होतो. त्याकरिता नांदुरा शहरतील राष्ट्रीय महामार्ग क्र.६ वरील विश्रामगृह ते हनुमान मुर्ती पर्यंंत उड्डान पुल व त्यावरुन टी आकाराच्या रेल्वे उड्डान पुलाचे काम होणे गरजेचे आहे. आमदार चैनसुख संचेती यांनी वेळोवेळी याबाबत विधान भवनात सदर रेल्वे गेटवर उड्डानपुलाचे काम तात्काळ सुरु करण्याबाबत शासनाला विनंती केली होती. १८ जून रोजी आ.चैनसुख संचेती व शिष्ट मंडळाने भूतल परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी तात्काळ संबंधित अधिकार्‍यांना आदेश देत येणार्‍या बजेटमध्ये या रेल्वे उड्डान पुलासाठी २५ कोटी रु. निधीची तरतुद करण्याचे आदेश दिले आहेत. अशी माहिती आ. संचेती यांनी दिली आहे.