शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

दलित वस्तीच्या २५ कोटींच्या हिशेबाला ठेंगा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 13:56 IST

अकोला : जिल्हा परिषेदेच्या समाजकल्याण विभागातून दलित वस्ती विकास योजनेच्या कामांसाठी दिलेल्या २५ कोटी रुपये निधी खर्चाची मुदत ३१ मार्च २०१८ रोजीच संपुष्टात आली आहे. तरीही त्या कामांवरील खर्चाचा हिशेब देण्यास ठेंगा दाखवला जात आहे.

ठळक मुद्देदलित वस्ती विकास योजनेंतर्गत २० कोटी ३१ लाखांच्या कामांना प्रशासकीय मंजुरी दिली. त्यापैकी १० कोटी १५ लाख ५० हजार निधीचे वितरण केले. शिल्लक असलेला तेवढाच निधी वितरित केलेला निधी खर्चानंतर २५ मार्च २०१८ पूर्वी मागणी करावा, अशीही अट होती.

अकोला : जिल्हा परिषेदेच्या समाजकल्याण विभागातून दलित वस्ती विकास योजनेच्या कामांसाठी दिलेल्या २५ कोटी रुपये निधी खर्चाची मुदत ३१ मार्च २०१८ रोजीच संपुष्टात आली आहे. तरीही त्या कामांवरील खर्चाचा हिशेब देण्यास ठेंगा दाखवला जात आहे. विशेष म्हणजे, त्या निधीतून केल्या जाणारी २७९ कामे नावालाच कंत्राटदाराकडे असून, त्यापैकी अनेक कामांमध्ये काही जिल्हा परिषदसदस्यांसह पदाधिकाऱ्यांचीच भागिदारी असल्याची चर्चा आहे.समाजकल्याण विभागाने ६ जानेवारी २०१८ रोजी दलित वस्ती विकास योजनेंतर्गत २० कोटी ३१ लाखांच्या कामांना प्रशासकीय मंजुरी दिली. त्यापैकी १० कोटी १५ लाख ५० हजार निधीचे वितरण केले. शिल्लक असलेला तेवढाच निधी वितरित केलेला निधी खर्चानंतर २५ मार्च २०१८ पूर्वी मागणी करावा, अशीही अट होती. त्याशिवाय, निधी २०१६-१७ चा असल्याने ३१ मार्च २०१८ पर्यंत खर्च करण्याचेही बजावले; मात्र ठरल्याप्रमाणे दलित वस्तीच्या २७९ कामांसाठी दिलेला निधी खर्च झाला की नाही, याची माहिती समाजकल्याण विभाग, अर्थ विभाग यापैकी कोणीही देण्यास तयार नाही. समाजकल्याण विभाग म्हणतो, पंचायत समिती स्तरावरून माहिती मागवली. ती अद्याप आली नाही. तर पंचायत समितींना वाटप केलेल्या निधीतून किती कामे पूर्ण झाली, किती कामांसाठी पुढील निधी मिळण्याची मागणी करण्यात आली. याचीही माहिती मुख्य लेखा व वित्त अधिकारी कार्यालयात नाही. एकूणच या निधी खर्चाबाबतची सद्यस्थिती काय आहे, ही माहिती कोणीही देण्यास तयार नाही. समाजकल्याण विभागाचे अधिकारी-कर्मचारी कानावर हात ठेवतात. अटींमुळे झाला निधी खर्चाचा गेमजिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार यांनी प्रशासकीय आदेशात काम करण्यासंदर्भातील अटी टाकल्या. त्यामध्ये कामाची इ-निविदा करण्याच्या अटीने निधी खर्चाचा गेम झाला. एकतर उशिरा म्हणजे, जानेवारीमध्ये मंजुरी देणे, त्यानंतर नको त्या अटी घातल्याने २५ कोटींचा निधी अखर्चित ठेवण्याची सोय करण्यात आली. त्याविरोधात तक्रारी झाल्यानंतर फेब्रुवारीमध्ये शासनाने स्पष्टीकरण दिले. तोपर्यंत निधी खर्च करण्याला बराच विलंब झाला. त्यामुळे दिलेला निधी खर्च न होता उर्वरित निधीची मागणीही झाली नसल्याची माहिती आहे.

 

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषद