शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

नवीन मतदार नोंदणीच्या कामगीरीत २५ मतदारसंघ अग्रेसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 18:05 IST

अकोला : मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार यादीत नवीन मतदारांची नावे नोंदविण्याच्या कामात राज्यातील २५ विधानसभा मतदारसंघात २७ आॅक्टोबरपर्यत अग्रेसर कामगीरी करण्यात आली आहे.

- संतोष येलकर

अकोला : मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार यादीत नवीन मतदारांची नावे नोंदविण्याच्या कामात राज्यातील २५ विधानसभा मतदारसंघात २७ आॅक्टोबरपर्यत अग्रेसर कामगीरी करण्यात आली आहे. त्यामध्ये अकोला जिल्ह्यातील अकोला पश्चिम नवव्या स्थानी तर बाळापूर विधानसभा मतदारसंघ पंधराव्यास्थानी आहे.निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे १ जानेवारी २०१९ या अर्हता दिनांकावर आधारीत मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार नोंदणीची मोहीम राबविण्यात येत आहे. १ सप्टेंबर ते ३१ आॅक्टोबर या कालावधीत राबविण्यात येत असलेल्या या मोहीमेत वयाची १८ वर्षे पूर्ण झालेल्या नवीन मतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ट करणे, मतदारांच्या नावात, पत्त्यात दुरुस्ती, स्थलांतरासंबंधी मतदारांकडून नमूना अर्ज भरुन घेणे तसेच मयत मतदारांची नावे यादीतून वगळण्याचे काम करण्यात येत आहे. वयाची १८ वर्षे पूर्ण झालेल्या नवीन मतदारांची नावे मतदार यादीत नोंदविण्यासाठी मतदारांकडून नमूना क्र.६ चा अर्ज भरुन घेण्यात येत आहे. मतदार नोंदणीसाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात प्रशासनामार्फत मतदार जागृतीचे कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. नवीन मतदार नोंदणीच्या कामगिरीत राज्यातील २५ विधानसभा मतदारसंघ अग्रेसर असल्याची माहिती राज्य मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत २७ आॅक्टोबर रोजी जाहीर करण्यात आली आहे. नवीन मतदार नोंदणीच्या कामात राज्यात अग्रेसर असलेल्या २५ विधानसभा मतदारसंघात अकोला जिल्ह्यातील अकोला पश्चिम नवव्या तर बाळापूर विधानसभा मतदारसंघ पंधराव्यास्थानी आहे.मतदार नोंदणीच्या कामात अग्रेसर असे आहेत विधानसभा मतदारसंघ !नवीन मतदार नोंदणीच्या कामगीरीत राज्यातील २५ विधानसभा मतदारसंघ अग्रेसर आहेत. त्यामध्ये धुळे शहर, अमरावती, औरंगाबाद पूर्व, मिरज, उस्मानाबाद, सांगली, परंडा, जालना, अकोला पश्चिम, नालासोपारा, उमरगा (एससी), तासगाव-कवठे महाकाळ, मालेगाव (मध्य),कल्याण पश्चिम, बाळापूर, खानपूर, नांदेड (उत्तर), भोकरदन, बोईसर (एसटी), कल्याण ग्रामीण, शिरुर, सिल्लोड, बीड, तुळजापूर, कोल्हापूर दक्षिण इत्यादी विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे.

मतदार याद्यांच्या संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत नवीन मतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी नमूना अर्ज क्र.६ भरुन घेणे व ‘डाटा एन्ट्री ’ करण्याच्या कामात राज्यातील २५ विधानसभा मतदारसंघात अग्रेसर कामगीरी करण्यात आली आहे. त्यामध्ये अकोला पश्चिम नवव्यास्थानी तर बाळापूर विधानसभा मतदारसंघ पंधराव्यास्थानी आहे.-वैशाली देवकरउपजिल्हाधिकारी (निवडणूक), अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाElectionनिवडणूक