शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

२४ गावे हस्तांतरणाचा ‘अँक्शन प्लॅन’!

By admin | Updated: September 1, 2016 02:46 IST

मनपा आयुक्त-जिल्हा परिषद ‘सीईओं’ची बैठक; २४ गावे हस्तांतरणाची प्रक्रिया सुरु.

अकोला, दि. ३१: महानगरपालिका हद्दवाढीमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या २४ गावांच्या हस्तांतरणाची प्रक्रिया मनपा प्रशासनामार्फत सुरू करण्यात आली. त्यासाठी मनपा आयुक्त आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांच्या (सीईओ) बैठकीत बुधवारी कृती आराखडा (अँक्शन प्लॅन)तयार करण्यात आला. मनपा हद्दवाढीत शिलोडा, नायगाव, वाकापूर, तपलाबाद, निजामपूर, अकोला ग्रामीण सुकापूर, अक्कलकोट, शहानवाजपूर, डाबकी, खडकी बु., अकोली खुर्द, अकोली बु., हिंगणा, सोमठाणा, शिवापूर, मलकापूर, शिवणी, शिवर, खरप बु., उमरी प्र.अकोला, उमरखेड, उमरी प्र.बाळापूर व गुडधी इत्यादी २४ गावे समाविष्ट करण्यात आली. मनपा हद्दवाढीची अधिसूचना मंगळवारी जाहीर झाल्यानंतर बुधवारी हद्दवाढीत समाविष्ट करण्यात आलेली गावे मनपा क्षेत्रात हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. २४ गावे जिल्हा परिषदकडून मनपाकडे हस्तांतरित करण्याच्या मुद्दय़ावर बुधवारी जिल्हा परिषदेत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण विधळे, मनपा आयुक्त अजय लहाने, उपायुक्त एस.सी.सोळंके व संबंधित अधिकार्‍यांच्या बैठकीत हद्दवाढीमध्ये समाविष्ट २४ गावांच्या हस्तांतरणाचा कृती आराखडा (अँक्शन प्लॅन ) तयार करण्यात आला. त्यामध्ये मनपा हद्दवाढीत समाविष्ट २४ गावांमधील ग्रामपंचायत, जिल्हा परिषद इमारती, सुरू असलेली इमारतींची बांधकामे, ग्रामपंचायत कर्मचार्‍यांचे समायोजन, कर वसुली व दंड वसुली इत्यादींच्या फाइल, अतिक्रमण कारवाईबाबतच्या फाइल इत्यादी बाबींचे मनपाकडे हस्तांतरण करण्याचे या बैठकीत ठरविण्यात आले. या सर्व बाबींची तपासणी करून अहवाल तयार करण्यात येणार आहे. तपासणीचा अहवाल जिल्हाधिकार्‍यांमार्फत विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात येणार असून, त्यानंतर २४ गावे मनपाकडे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. या बैठकीला मनपा व जिल्हा परिषदेचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.