शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

शासनाच्या मंजुरीशिवायच काढले २४ लाखांचे देयक

By admin | Updated: January 31, 2017 02:26 IST

बांधकाम विभागाच्या प्रस्तावाला अर्थ विभागाची डोळे मिटून मंजुरी

अकोला, दि. ३0- दोन रोजंदारी मजुरांना हजेरीपत्रकावर घेत त्यांना फरकाची रक्कम २४ लाख रुपये अदा करण्यात बांधकाम विभागासोबतच अर्थ विभागाने कमालीची तत्परता दाखवली आहे. या देयकासाठी शासनाची मंजुरी आवश्यक असतानाही त्याचे भान न ठेवता तातडीने जिल्हा कोषागारातून ती रक्कम काढण्यात आली. धनादेश तयार झाल्यानंतर ही बाब उघडकीस आल्याने याप्रकरणी चौकशी सुरू झाली आहे.जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अकोला उपविभागातील दोन मजुरांना हजेरीपत्रकावर घेण्याचा आदेश न्यायालयाने दिला. त्या आदेशाचा सोयीप्रमाणे अर्थ लावत त्यांना वेतनातील फरकाची रक्कम देण्याचा प्रस्ताव तयार झाला. त्यासाठी तब्बल २४ लाख रुपयांच्या फरकाच्या रकमेचे देयक अकोला उपविभागात तयार झाले. त्या देयकाची तपासणी कार्यकारी अभियंता कार्यालयात शृंगारे नामक कर्मचार्‍याने केली. तत्कालीन कार्यकारी अभियंता अनंत गणोरकर यांनीही मंजुरी दिली. प्रस्ताव थेट मुख्य लेखा व वित्त अधिकारी गीता नागर यांच्याकडे पोहचला. अर्थ विभागाने देयकाची रक्कम मिळण्यासाठी जिल्हा कोषागार अधिकारी कार्यालयात पोहचला. कोषागार कार्यालयातून देयकापोटी २४ लाख रुपये जिल्हा परिषदेला वळतेही करण्यात आले. त्यातून संबंधित मजुरांच्या नावे धनादेश तयार झाले. मात्र, २४ लाखांचे देयक अदा करण्यासाठी शासनाची मंजुरीच नाही, हा प्रकार शेवटच्या टप्प्यात उघड झाला. याप्रकरणी मोठी अनियमितता झाल्याने मजुरांचे धनादेशच थांबवण्यात आले. त्यामध्ये बांधकाम आणि अर्थ विभागाच्या अधिकारी-कर्मचार्‍यांनी जाणीवपूर्वक केलेल्या गोंधळाने मजुरांना नाहक त्रास सहन करण्यासोबतच शासनाची फसवणूक झाल्याचा प्रकार घडला आहे.