शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

‘दुरोंतो’मध्ये आता मिळणार २४ तास आरोग्य सुविधा

By admin | Updated: December 12, 2014 00:22 IST

हावडा-मुंबई एक्सप्रेसमध्ये प्रायोगिक तत्वावर सुविधा.

राम देशपांडे/अकोला दुरोंतो एक्सप्रेस रेल्वे गाड्यांमध्ये लवकरच २४ तास आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला असून, पहिल्या टप्प्यात हावडा-मुंबई दुरोंतो एक्सप्रेसमध्ये (१२२६२/१२२६१) ही सुविधा प्रायोगिक तत्वावर सुरू केली जाणार आहे. त्यासाठी नेमलेल्या चमूमध्ये डॉक्टर, पॅरामेडिकल स्टाफ आणि परिचारिका २४ तास उपलब्ध राहणार आहे.इतर प्रवासी गाड्यांप्रमाणे दुरोंतो एक्सप्रेस प्रत्येक स्थानकावर थांबत नाही. केवळ ठराविक रेल्वे स्थानकांवरच या गाड्या थांबत असल्याने, दुरोंतोच्या प्रवाशांना आरोग्य सुविधेची गरज भासल्यास ती मिळण्यास वेळ लागू शकतो. अशावेळी एखाद्या प्रवाशाचा मृत्यूदेखील होऊ शकतो. या सर्व बाबींचा विचार करून, देशातील सर्व विभागांमध्ये लांब पल्ल्यासाठी सुरू करण्यात आलेल्या दुरोंतो एक्सप्रेसमध्ये २४ तास आरोग्य सुविधा पुरविण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. देशभरात वेगवेगळय़ा ६२ मार्गांवर दुरोंतो एक्सप्रेस गाड्या धावतात. या गाड्यांमध्ये आरोग्य सुविधा उपल्बध करून देण्यास रेल्वे बोर्डाची मंजुरातही मिळाली आहे. त्यामुळे या एक्सप्रेसच्या प्रवाशांना या सुविधेचा लाभ लवकरच मिळण्याची शक्यता आहे.