ठळक मुद्देविशेष पथकाची मोठी कारवाई
अकोला : जुने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गंगानगरमध्ये कत्तलीसाठी एका टिनाच्या गोदामात अत्यंत निर्दयीपणे डांबून ठेवलेल्या २४ गुरांना विशेष पोलीस पथकाने छापा टाकून जीवनदान दिले. तसेच घटनास्थळावरुन एक कारही जप्त केली. गुरे तस्कर गुल्लू कुरेशी याच्या गोदामात शनिवारी ही कारवाई करण्यात आली. या कारवाईची कुणकुण लागताच गुल्लु कुरेशी फरार झाला. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करीत आहेत.