शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
7
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
8
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
9
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
10
आयोग नव्हे, मतदारच राजा !
11
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
12
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
13
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
14
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
15
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
16
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
17
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
18
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
19
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
20
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

मूर्तिजापूर तालुक्यातील २३ गावे अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2021 19:10 IST

23 villages in Murtijapur taluka in darkness : यासाठी १ कोटी ७ लाख ३७ हजार ४७० पथदिवे देयके बाकी आहे तर पाणी पुरवठ्याचे २३ लाख ५८ हजार ७३८ अशी थकबाकी आहे. 

-संजय उमक मूर्तिजापूर : महावितरण कडून ग्रामपंचायतीनां पथदिवे व स्थानिक पाणीपुरवठ्या वीज पुरवठा करण्यात येतो, याची देयके अद्याप पर्यंत अदा न केल्याने महावितरणने ग्रामपंचायतचा वीज तोडणी कार्यक्रम हातात घेतला आहे. या मोहिमेंतर्गत सद्यस्थितीत तालुक्यात २३ गावे अनेक दिवसांपासून अंधारात आहेत.  तर १७ गावांचा पाणी पुरवठा खंडित झाला असल्याने नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.           एप्रिल महिन्यापासून महावितरणने वसूली अभियान जोरात सुरु केले, ग्रामपंचायती मार्फत गाव पातळीवर राबविण्यात येणाऱ्या नागरीकांच्या मुलभूत सोईची जबाबदारी ग्रामपंचायतवर असताना या मुलभूत गरजांकडे दुर्लक्ष होत असल्याची बाब समोर आली आहे. अशातच ग्रामपंचायतीनी पथदिवे व पाणी पुरवठा करणाऱ्या मोटपंपाचे वीज बिल भरणा न केल्याने तालुक्यातील २३ गावांवर अंधाराचे साम्राज्य ओढवल्या गेले आहे तर १७ गावांना कृत्रिम जल संकटाचा सामना करावा लागत आहे. यासाठी १ कोटी ७ लाख ३७ हजार ४७० पथदिवे देयके बाकी आहे तर पाणी पुरवठ्याचे २३ लाख ५८ हजार ७३८ अशी थकबाकी आहे.          सध्या राज्यात कोरोना परिस्थिती पाहता ग्रामीण भागात आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत. आरोग्य यंत्रणा बीजेअभावी उपकरणांचा वापर करू शकत नाही. ग्रामीण भागात पथ दिव्यांची आणि पाणी पुरवठा प्रकल्प योजनेची विद्युत देयके अदा न केल्याने विकट परिस्थिती निर्माण झाली आहे. सद्य परिस्थिती पहाता पंधराव्या वित्त आयोगाच्या अबंधित अनुदानानुन पथ पिण्याची देयके आणि बंधित अनुदानातुन पाणी पुरवठा योजनांची विद्युत देयके अदा करण्यास २३ जून रोजी ग्राम विकास विभागाकडून तसे परीपत्रक काढून मान्यता दिली आहे. सर्व प्रथम पथ दिव्यांची विद्युत देयके आणि पाणी पुरवठा योजनांची विद्युत देयके अदा करून १५ व्या केंद्रीय वित्त आयोगाच्या बंधित आणि अबंधित निधीतून इतर खर्च नंतरकरावा, ग्रामपंचायतीने लवकरात लवकर सौर उर्जेवर भर देऊन त्याचा वापर करण्यास प्राधान्य दयावे, व्यवस्थित लेखांकन होण्याच्या दृष्टीने व घटनात्मक दुरुस्तीच्या अनुषंगाने त्या त्याग्रामपंचायतीने १५ व्या केंद्रीय वित्त आयोगाच्या अबंधित अनुदानातून (अनटाइड) पथदिव्यांची वीज देयके आणि बंधित अनुदानातून (टाइड) पाणी पुरवठा योजनांची वीजदेयके ग्रामपंचायत स्तरावरब अदा केली जाईल असेही परीपत्रकात म्हटले आहे.          फेब्रुवारी २०२१ पर्यंत ही वीज देयके शासना मार्फत अदा केली जाता असे परंतु आता ती देयके ग्रामपंचायतीच्या खांद्यावर देण्यात आली आहे. शासन हा भार उचलण्यास आता तयार नसल्याने त्या बिलाची रक्कम ग्रामपंचायतीने १५ व्या वित्त आयोगातून अदा करायची आहे.

टॅग्स :Murtijapurमुर्तिजापूरmahavitaranमहावितरण