शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपुरवठा विभागाची २३ कोटींची थकबाकी

By admin | Updated: March 3, 2017 01:51 IST

मजिप्राची वसुली मोहीम : अकोटमध्ये दोघांविरुद्ध अदखलपात्र गुन्हा

अकोट, दि.२ : महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाची अकोट शहरातील ग्राहकांकडे तब्बल २३ कोटी रुपयांची थकबाकी झाली आहे. अशा स्थितीत एकीकडे पाणीपुरवठा सुरू असताना दुसरीकडे मजिप्राने वसुली मोहीम सुरू केली आहे. या वसुली मोहिमेदरम्यान अडथळा निर्माण करणाऱ्या दोघांविरुद्ध २ मार्च रोजी अकोट शहर पोलिसात अदखलपात्र गुन्हे दाखल करण्यात आले आहे. अकोट शहराला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमार्फत घरगुती, व्यावसायिक व इतर ग्राहकांना पाणीपुरवठा करण्यात येतो. शहरात मजिप्राची ८ हजार अधिकृत जोडण्या आहेत. त्यामध्ये अंदाजे १,३०० जोडण्या बंद आहेत. या ग्राहकांना दरमहा देयके देण्यात आल्यानंतरही गत अनेक वर्षांपासून ग्राहकांनी देयकाची रक्कम जमा केली नाही. त्यामुळे ही थकबाकी २३ कोटींच्या घरात पोहचली आहे. यामध्ये नगर परिषद च्या स्टँडपोस्ट देयकांचासुद्धा समावेश आहे. या ग्राहकांकडे वारंवार देयकांची मागणी करूनही वसुली होत नसल्याने मजिप्राने शहरात कनेक्शन कटसह वसुलीची मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेदरम्यान काजीपुरा या ठिकाणी पाणीपट्टीच्या थकबाकी वसुली करण्याच्या कामी सरकारी काम करत असताना अ. सादिक अ. खालीक, अ. मुजाहिद अ. सादिक या दोघांनी मुजोरी करून वाद घालून सरकारी कामात अडथळा निर्माण केला. याबाबतची तक्रार शाखा अभियंता वसीम अहेमद मो. सुलेमान यांनी अकोट शहर पोलीस स्टेशनला दिली असता अदखलपात्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शहरात अधिकृत कनेक्शनसोबत मोठ्या प्रमाणात अवैध कनेक्शन वाढीस लागली आहेत. त्यामुळे पाणीपुरवठा अपुरा होत असून मजिप्रालासुद्धा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. अशा अवैध नळ जोडण्यांचा शोध घेऊन त्यांच्यावरसुद्धा फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. नळधारकांनी पाणीपट्टीची थकबाकी भरून मजिप्राला सहकार्य करून कारवाई टाळावी. तसेच अवैधरित्या कनेक्शन आढळल्यास अवैध जोडण्या करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. - हरिदास ताठे उपअभियंता, मजिप्रा, अकोट