शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गांवरील २२0 वाइन बार कारवाईच्या धोक्याबाहेर !

By admin | Updated: March 25, 2017 01:31 IST

शासनाचे आदेश मागे; अकोला क्षेत्रातील फक्त ३१ दुकानांचे परवाने रद्द होणार!

अकोला, दि. २४- महामार्गावरील वाइन बार, शॉप हटविण्याचे आदेश दिल्याने लिकर लॉबीमध्ये खळबळ उडाली होती आणि १ एप्रिलपासून राज्य मार्गावरील वाइन बार, बियर शॉपी आणि देशी दारू दुकानांचे नूतनीकरण करू नये, असे आदेशसुद्धा बजावण्यात आले होते, त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभाग कामालासुद्धा लागला होता; परंतु शासनाने राष्ट्रीय व राज्य महामार्गावरील परमिट रूम व सर्व बारचे परवाने देण्याचा आदेशच अधिकार्‍यांना दिला असल्याने शहरातीलच नव्हे तर जिल्हय़ातील २२0 वाइन बार, परमिट रूम कायम राहणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय फक्त रिटेलमध्ये दारू विक्रेत्यांसाठीच असल्याने राष्ट्रीय व राज्य महामार्गावरील ३१ बियर शॉपी, दारू दुकानांचे परवाने रद्द होणार आहेत. राष्ट्रीय व राज्य मार्गांंवर दारूविक्रीमुळे अपघातांचे प्रमाण वाढत असल्याचे कारण पुढे करीत ५00 मीटर क्षेत्रात असलेल्या वाइन बार, वाइन शॉप, बियर शॉपी हटविण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. १ एप्रिलपासून या दुकानांचे नूतनीकरण करण्यात येऊ नये, असे आदेश राज्य उत्पादन शुल्क विभागाला देण्यात आले होते. दारूची दुकाने, वाइन बार हटविण्याच्या दृष्टिकोनातून सार्वजनिक बांधकाम विभाग आणि भूमीअभिलेख विभागाच्यावतीने महामार्गावरील दारू दुकानांची मोजणीसुद्धा केली होती. सद्यस्थितीत जिल्हय़ामध्ये देशी, विदेशी, परमिट रूम, होलसेलर, बियर शॉपी असे एकूण २५१ दुकाने आहेत. त्यापैकी ८0 टक्के दारूची दुकाने, वाइन बार हे महामार्गावरच आहेत; परंतु आता शासनाने राष्ट्रीय व राज्य महामार्गावरील परमिट रूम व सर्व बारचे परवाने देण्याचा आदेश राज्य उत्पादन शुल्क विभागाला दिले आहेत. राज्याचे अँटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी, सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय फक्त रिटेलमध्ये दारू विक्री करणार्‍यांसाठीच असल्याचे स्पष्ट केल्यामुळे शासनाने परवाने देण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे जिल्हय़ात राष्ट्रीय व राज्य महामार्गावर असलेल्या १९ वाइन शॉप आणि १२ बियर शॉपला ५00 मीटर क्षेत्राबाहेर जावे लागणार आहे.