शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

२२ खेळाडू राष्ट्रीय क्रीडा शिष्यवृत्तीस पात्र!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 02:29 IST

अकोला: भारतीय शालेय खेळ महासंघ, भोपाळ यांच्यावतीने राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेत सहभाग व प्रावीण्य मिळविणार्‍या खेळाडूंना क्रीडा शिष्यवृत्ती देण्यात येते. या राष्ट्रीय क्रीडा शिष्यवृत्तीकरिता अकोला जिल्हय़ातील २२ खेळाडू पात्र ठरले आहेत.

ठळक मुद्दे२0१६-१७ वर्षासाठी शिष्यवृत्ती भारतीय शालेय खेळ महासंघाची योजना 

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: भारतीय शालेय खेळ महासंघ, भोपाळ यांच्यावतीने राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेत सहभाग व प्रावीण्य मिळविणार्‍या खेळाडूंना क्रीडा शिष्यवृत्ती देण्यात येते. या राष्ट्रीय क्रीडा शिष्यवृत्तीकरिता अकोला जिल्हय़ातील २२ खेळाडू पात्र ठरले आहेत.सन २0१६-१७ या वर्षामध्ये क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने  विविध खेळाच्या राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये सहभाग घेणार्‍या व प्रावीण्य प्राप्त करणार्‍या अकोला जिल्हय़ातील खेळाडूंना क्रीडा स्पर्धा शिष्यवृत्तीचे वाटप थेट त्यांच्या बँक खात्यात ऑनलाइन पद्धतीने करण्यात येणार आहे. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांंमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त करणार्‍या खेळाडूंना रुपये ११२५0, द्वितीय क्रमांक प्राप्त करणार्‍यास ८९५0 व तृतीय क्रमांक प्राप्त करणार्‍या खेळाडूस रुपये ६७५0 व सहभागी खेळाडूस ३७५0 रुपये एवढी शिष्यवृत्ती देण्यात येते.जिल्हय़ातील बॉक्सिंग, कुडो, कबड्डी, तायक्वांदो, हॅण्डबॉल, व्हॉलीबॉल, बेसबॉल, रस्सीखेच,  खो-खो, वेटलिफ्टिंग आदी खेळाचे खेळाडू शिष्यवृतीस पात्र ठरले आहेत. यामध्ये शाकीब अक्रम खान बॉक्सिंग, ऋषिकेश काळे कुडो, ऋतुजा वावगे कबड्डी, ऋतिक शिंदे बॉक्सिंग, अंजली तायडे तायक्वांदो, समृद्धी गोसावी हॅण्डबॉल, हर्षल मेश्राम व्हॉलीबॉल, आरती सोनवणे बेसबॉल, गौरी जयसिंगपुरे बॉक्सिंग, पल्लवी जोशी कुडो, सय्यद अली बॉक्सिंग, जयश्री तायडे रस्सीखेच, रोहिणी फड तायक्वांदो, पुनम कैथवास बॉक्सिंग, युग गावंडे बेसबॉल, साक्षी गायधनी बॉक्सिंग, प्रशंसा तायडे कुडो, अजय पेंदुर बॉक्सिंग, शिवानी सुरवाडे रस्सीखेच, भावेश खोकले खो-खो, देवानंद शुक्ला वेटलिफ्टिंग, कादंबरी खापरे बेसबॉल या खेळाडूंचा समावेश आहे.पात्र ठरलेल्या खेळाडूंनी आपले सहभाग, प्रावीण्यप्राप्त केलेल्या सन २0१६-१७ चे राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेच्या प्रमाणपत्राची छायांकित प्रत, खेळाडूंचे बँक खात्याच्या पासबुकची झेरॉक्स, आधार कार्डची झेरॉक्स २0 ऑगस्टपूर्वी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात जमा करावी. अधिक माहितीकरिता क्रीडा अधिकारी श्याम देशपांडे यांच्याशी संपर्क साधावा, अशी माहिती प्रभारी जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश कुळकर्णी यांनी दिली.