शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

पहिल्या टप्प्यात २0४ पोलिस कर्मचार्‍यांच्या बदल्या

By admin | Updated: May 29, 2014 00:02 IST

पहिल्या टप्प्यामध्ये पोलिस अधीक्षक वीरेंद्र मिश्र यांनी २0४ पोलिस कर्मचार्‍यांच्या बदल्या केल्या आहेत.

अकोला : बुधवारी पहिल्या टप्प्यामध्ये पोलिस अधीक्षक वीरेंद्र मिश्र यांनी २0४ पोलिस कर्मचार्‍यांच्या बदल्या केल्या आहेत. बदल्या झालेल्यांमध्ये २९ सहायक पोलिस उपनिरीक्षक आणि १९ महिला पोलिस कर्मचार्‍यांचा समावेश आहे. गेल्या काही दिवसांपासून पोलिस कर्मचार्‍यांना बदल्यांविषयी उत्सुकता होती. पोलिस कर्मचार्‍यांच्या बदल्या झाल्यामुळे कुठे खुशीचे तर कुठे गमचे वातावरण दिसून आले. गत आठवडाभरापासून बदल्यांसाठी पोलिस कर्मचार्‍यांच्या नावांची यादी तयार करणे सुरू होते. त्यासाठी पोलिस अधीक्षकांनी पोलिस कर्मचार्‍यांचे अर्जसुद्धा मागवले होते. काही कर्मचार्‍यांनी बदलीसाठी विनंती अर्ज केले होते. त्यानुसार पोलिस अधीक्षकांनी बदल्यांचे नियोजन केले. बुधवारी पोलिस अधीक्षकांनी पहिल्या टप्प्यामध्ये २0४ पोलिस कर्मचार्‍यांच्या बदल्यांची यादी जाहीर केली. यादी पाहण्यासाठी सायंकाळी ५ वाजतापासूनच पोलिस अधीक्षक कार्यालयात शहरातील पोलिस कर्मचार्‍यांनी गर्दी केली होती. प्रत्येकाला आपली वर्णी कोणत्या पोलिस ठाण्यात लागते, याचीच उत्सुकता होती. यादी जाहीर होताच, आपली बदली कोठे झाली, हे पोलिस कर्मचार्‍यांनी माहिती करून घेतले. दूर तालुक्याच्या ठिकाणी, ग्रामीण विभागात बदली झालेल्या कर्मचार्‍यांच्या चेहर्‍यावर उदासीनता जाणवत होती तर शहरामध्ये किंवा अपेक्षित पोलिस ठाण्यात, मुख्यालयात बदली झालेल्या पोलिस कर्मचार्‍यांच्या चेहर्‍यावर आनंद ओसंडून वाहत होता. झालं बुवा एकदाचं! आता सहा वर्ष सुरळीत काढायचे, असाच एकंदरित सूर पोलिस कर्मचार्‍यांच्या तोंडून निघत होता.

** अनेकांनी घातले श्रींचरणी साकडेबदल्यांचे वारे सुरू होताच, पोलिस कर्मचार्‍यांनी शहरापासून जवळ किंवा शहरातच बदलीचे ठिकाण मिळावे. यासाठी शेगावीच्या संत गजानन महाराजांच्या चरणी साकडे घातले होते. बुधवारी बदल्यांची यादी जाहीर होणार असल्याने अनेक पोलिस कर्मचार्‍यांनी सकाळी शेगाव गाठून संत गजानन महाराजांकडे प्रार्थना केली. काही कर्मचार्‍यांची प्रार्थना फळास आली तर काहींच्या हाती निराशा आली.

** बदल्या झालेल्यांमध्ये २९ एएसआय, १९ महिला पोलिस बुधवारी जाहीर झालेल्या यादीनुसार जिल्ह्यासह शहरातील २९ सहायक पोलिस उपनिरीक्षक, १९ महिला पोलिस कर्मचारी, सहायक पोलिस उपनिरीक्षक, ७१ हेड कॉन्स्टेबल, ५७ पोलिस नाईक आणि २८ पोलिस कॉन्स्टेबल, अशा एकूण २0४ पोलिस कर्मचार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या.

** दुसरी यादी आज जाहीर होणारपहिल्या टप्प्याच्या बदल्यांची यादी जाहीर झाल्यानंतर आता दुसर्‍या टप्प्यातील बदल्यांची यादी गुरुवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. यामध्ये विनंती अर्ज आणि इतरांचा समावेश राहील.