शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

२00 क्विंटल धान्य गायब!

By admin | Updated: July 16, 2017 02:39 IST

अकोटच्या गोदामातील प्रकार : तपासणीत उघड झाला अपहार.

सदानंद सिरसाट । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: गरिबांना शिधापत्रिकांवर पुरवठय़ासाठी गोदामात साठा केलेल्या गहू आणि तांदळापैकी २00 क्विंटल धान्य गायब झाल्याचे समोर आले आहे. या धान्याची काळ्य़ा बाजारात विक्री करून अपहार झाल्याचा संशय आहे. जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाने अकोटचे तहसीलदार विश्‍वनाथ घुगे यांनी शनिवारी अचानक केलेल्या तपासणीत हा घोळ उघड झाला आहे. त्याबाबतचा अहवाल जिल्हाधिकार्‍यांना सादर केल्याची माहिती आहे.शिधापत्रिकाधारकांना वाटप करावयाच्या धान्याचा अकोट, तेल्हारा तालुक्यातून सातत्याने अपहार होत असल्याच्या घटना यापूर्वीही उघड झाल्या आहेत. त्यामुळे या गोदामाकडे सातत्याने लक्ष देणे आवश्यक आहे. त्याची दखल घेत जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष शिंदे यांनी तातडीने गोदामाची चौकशी करण्याचे आदेश तहसीलदार विश्‍वनाथ घुगे यांनी दिले. त्यानुसार शनिवारी दिवसभर गोदामातील धान्याचा ताळमेळ घेण्यात आला. तसेच पोत्यांचे प्रमाणीकरण करण्यात आले. त्यामध्ये गोदामातील उपलब्ध साठय़ापैकी १४३ क्विंटल गहू आणि ४0 क्विंटलपेक्षाही अधिक तांदूळ कमी असल्याचे स्पष्ट झाले आहे. तपासणीचा अहवाल शनिवारी सायंकाळीच जिल्हाधिकार्‍यांकडे सादर करण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे आता गोदामपाल मंगेश मेश्राम यांच्यावर कारवाईची टांगती तलवार आहे. गोदामातून तीन वर्षात तिसर्‍यांदा अपहारअकोटच्या गोदामातून सर्रासपणे धान्याचा अपहार होण्याच्या घटना घडतात. यापूर्वीही त्या उघडकीस आल्या आहेत. त्यामध्ये गोदामपाल थिटे यांच्या काळात ३00 ते ४00 क्विंटल, त्यानंतरचे योगेश जांभूरकर यांच्या काळात २00 क्विंटलपेक्षाही अधिक धान्याचा साठा गोदामात कमी आढळला होता. त्यांच्यावर निलंबनासह अपहारित धान्याची रक्कम वसुलीची कारवाई झाली आहे. आता गोदामपाल मंगेश मेश्राम यांच्या काळातील धान्यसाठय़ाची चौकशी झाली आहे. त्यामध्ये गहू आणि तांदुळाची मिळून ४ लाख रुपयांपर्यंत किंमत असलेल्या धान्याचा अपहार झाल्याचे स्पष्ट होत आहे. अकोट-तेल्हार्‍यात रेशन माफियांचे राज्यविशेष म्हणजे, तेल्हारा तालुक्यातून तर २00 क्विंटल तांदळाचा ट्रक दरमहा नागपूरच्या खुल्या बाजारात विकण्याचा धंदाच या दोन्ही तालुक्यातील माफियांनी सुरू केला होता. तसा प्रकार उघड झाल्यानंतरही तेल्हारा येथील तत्कालीन गोदामपालावर कुठलीच कारवाई प्रशासनाने केली नव्हती. केवळ त्याची बदली अकोट येथे करून पुरवठा विभाग समाधानी झाला होता. त्यानंतरही या तालुक्यातच तांदुळाची वाहतूक करणार्‍या वाहनाविरोधात निरीक्षण अधिकार्‍यांनीच फौजदारी तक्रार दाखल केली होती. त्यामध्ये असलेला आरोपी शालेय पोषण आहाराचा अकोट तालुका उपकंत्राटदाराचा भाऊ आहे, हे विशेष. यावरून या तालुक्यांमध्ये होत असलेल्या गैरप्रकारांचा अंदाज येतो. गोदामातील धान्याचा ताळमेळ शनिवारी दिवसभर घेतला आहे. पोत्यांचे प्रमाणीकरण सुरू आहे. नियमित तपासणी असून, त्याबाबतचा अहवाल उद्यापर्यंत जिल्हाधिकार्‍यांकडे सादर केला जाईल.- विश्‍वनाथ घुगे, तहसीलदार अकोट.