शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

२० हजार क्विंटल तुरीवर व्यापाऱ्यांचा डोळा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2017 01:44 IST

नाफेडची तूर खरेदी बंद: हजारावर शेतकरी तूर विक्रीपासून वंचित

अकोला : शासनाने रविवारपासून नाफेडच्या शासकीय खरेदी केंद्रामार्फत तूर खरेदी बंद केल्यामुळे जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांवर संकट कोसळले आहे. अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात २० हजार क्विंटल तूर मोजमापाच्या प्रतीक्षेत होती; परंतु या तुरीवर आता व्यापाऱ्यांचा डोळा आहे. मनमानी भावाने शेतकऱ्यांकडील तूर खरेदी करण्यास व्यापारी उत्सुक असल्याचे येथील चित्र आहे.गत दोन महिन्यांपासून अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीसह जिल्ह्यातील पाच केंद्रांवर शासकीय खरेदी केंद्रांवर हमीभावाने तूर खरेदी करण्यात येत होती; परंतु यातही शेकडो व्यापाऱ्यांनी घुसखोरी करून आपली तूर विकली. खासगी व्यापाऱ्यांच्या तुलनेत नाफेडच्या खरेदी केंद्रांवर तुरीला ५०५० रुपये भाव मिळत असल्याने, शेतकऱ्यांचा अधिक कल नाफेडकडे होता; परंतु नाफेडचे अधिकारी तूर खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांची गर्दी कशी कमी होईल, त्यांची कमी प्रमाणात तूर कशी येईल, यासाठी शेतकऱ्यांना त्रास देत होते. सुरुवातीला काही रात्री उशिरापर्यंत तुरीचे माप व्हायचे; परंतु पुढे नाफेडने ५ वाजेपर्यंतच तुरीचे माप करण्याची भूमिका स्वीकारली. कृषी उत्पन्न बाजार समितीकडून शेतकऱ्यांना टोकन दिले जात होते; परंतु नाफेडकडून दररोज २० ते २५ शेतकऱ्यांचीच तूर खरेदी केली जात होती. शेतकऱ्यांना वेठीस धरण्यासाठी नाफेडचे अधिकारी सातत्याने प्रयत्न करीत होते. एवढेच नाही, तर अधिकाऱ्यांकडून नाफेडच्या केंद्रावर शेतकऱ्यांनी तूर विक्रीसाठी आणूच नये, असेही प्रयत्न केल्या जात होते. रविवारपासून नाफेडने तूर खरेदी बंद केल्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठी चिंता निर्माण झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून बाजार समिती आवारात ट्रॅक्टरात पडून असलेली तूर आता कोठे विकावी, खासगी व्यापाऱ्याला तूर विकायचे म्हटले तर व्यापारी मातीमोल भावाने तुरीची खरेदी करेल. नाफेडची तूर खरेदी बंद झाल्याने आता व्यापारी शेतकऱ्यांच्या तुरीवर डोळा ठेवून आहेत. दरम्यान याबाबत नाफेडच्या अधिकाऱ्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.शेतकऱ्यांची हाती धुपाटणे...शेकडो शेतकऱ्यांची तूर ट्रॅक्टर, मालवाहू वाहनामध्ये बाजार समितीच्या आवारात पडून आहेत. आज ना उद्या तुरीचे माप होईल, अशी शेतकऱ्यांना प्रतीक्षा होती. त्यामुळे शेतकरी पाचशे रुपये रोजाप्रमाणे भाड्याने ट्रॅक्टर व मालवाहू वाहनामध्ये तूर विक्रीसाठी घेऊन आले; परंतु आता अचानक नाफेडने तूर खरेदी बंद केल्याने, शेतकऱ्यांना वाहनांच्या भाड्याचा भुर्दंड सहन करावा ला गेल आणि व्यापारी मागेल त्या भावाने तूर विकावी लागेल.