शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

व-हाडात २0 हजार हेक्टरवर पीकांचे नुकसान !

By admin | Updated: March 5, 2016 02:30 IST

गारपीट,अवकाळी पावसाचा फटका.

अकोला : सलग तीन दिवस झालेल्या गारपीटीसह अवकाळी पावसाने वर्‍हाडातील पाच जिल्हयातील रब्बी पिकासंह भाजीपाला व फळ पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. महसूल व कृषी विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार या भागातील २0 हजार ४0४ हेक्टर क्षेत्रावरील पिकांना झळ बसली आहे. पावसाच्या अनिश्‍चिततेमुळे गत वर्षी खरीप पिकाचे मोठे नुकसान झाले. त्याचा परिणाम रब्बी पिकांच्या पेरणीवर झाला. जमिनीत ओलावा नसल्याने सोयाबीनच्या खाली क्षेत्रावर शेतकर्‍यांना रब्बी पिके घेता आली नाही. कोरडवाहू शेतकर्‍यांसह संरक्षित सिंचनाची सोय असलेल्या शेतकर्‍यांनीही गहू,हरबरा आदी पिकांची पेरणी केली; पंरतु तीन दिवस वादळी वार्‍यासह आलेल्या अवकाळी पावसाने मुख्यत्वे गहू,हरबरा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे अनेक ठिकाणचा आंबा मोहोर झडला आहे. भाजीपाल्याचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. कांदा पिकावर सर्वाधिक परिणाम झाला असून, इतरही सर्वच भाजीपाला पिकाच्या गुणवत्तेवर परिणाम झाला आहे. सध्या अनेक भागात शेतकर्‍यांनी हरबरा काढणीला सुरू वात केली आहे. अनेक शेतात गंजी लावलेल्या दिसत आहे; पंरतु अचानक आलेल्या या अवकाळी पावसामुळे शेतकर्‍यांची तारांबळ उडाली असून, गंजी झाकण्यासाठी शेतकर्‍यांची धावपळ सुरू आहे. दरम्यान, प्रशासकीय यंत्रणेने प्रत्येक भागात जावून पिकांची पाहणी केली. या पाहणीत रब्बी पिकांसह फळ, भाजीपाला पिकांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. प्राथमिक अंदाजानुसार यवतमाळ जिल्हयातील ८ हजार १९५ हेक्टरपेक्षा अधिक पिकांचे नुकसान झाले आहे. बुलडाणा जिल्हयात १ हजार ८५0 हेक्टरच्यावर,वाशिम १,१२0 हेक्टरवर, अकोला २११ हेक्टर तर अमरावती जिल्हयातील ९ हजार २८ हेक्टर क्षेत्रावरील रब्बी पिके, फळे,भाजीपाला पिकाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.