शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

२0 शेतक-यांना मिळाला सौर कृषिपंपांचा आधार!

By admin | Updated: June 6, 2016 02:38 IST

अकोला जिल्हय़ासाठी एक हजार सौर कृषिपंपांचे उद्दिष्ट असून, आतापर्यंंत ६८४ लाभार्थींंची निवड करण्यात आली.

अतुल जयस्वाल/ अकोलाकेंद्र शासनाच्या उपक्रमांतर्गत विदर्भातील शेतकरी आत्महत्याग्रस्त सहा जिल्हय़ांमध्ये शेतकर्‍यांसाठी सौर कृषिपंप योजना राबविण्यात येत आहे. यामध्ये अकोला जिल्हय़ासाठी एक हजार सौर कृषिपंपांचे उद्दिष्ट असून, आतापर्यंंत ६८४ लाभार्थींंची निवड करण्यात आली आहे. यापैकी २0 शेतकर्‍यांच्या विहिरींवर सौर कृषिपंप बसविण्यात आले आहेत. राज्यातील अकोला, अमरावती, बुलडाणा, यवतमाळ आणि वर्धा या सहा जिल्हय़ांसाठी सौर कृषिपंप योजना राबविण्यात येत आहे. पारंपरिक वीज निर्मितीकरिता असलेल्या र्मयादा आणी वाढती मागणी, यामुळे वीज भारनियमन केले जाते. ग्रामीण भागात शेतकर्‍यांच्या कृषिपंपांना पुरेशी वीज उपलब्ध होत नाही. विहिरींना पाणी असूनही केवळ विजेअभावी सिंचनात अडथळे येतात. यावर तोडगा म्हणून शेतकर्‍यांना अनुदानावर सौर कृषिपंप वितरित करण्याची योजना सुरू करण्यात आली आहे. यामध्ये लाभार्थी शेतकर्‍यांना ७.५ अश्‍वशक्तीपासून ते ३ अश्‍वशक्ती क्षमतेचा सौर उज्रेवर चालणारा कृषिपंप देण्यात येतो. पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन नसलेले शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत. यासाठी लाभार्थी हिस्सा म्हणून शेतकर्‍याला केवळ पाच टक्के रक्कम भरावी लागते. केंद्र सरकार ३0 टक्के, तर राज्य सरकार ५ टक्के अनुदान देते. उर्वरित ६0 टक्के रक्कम कर्जस्वरूपात उपलब्ध करून देणार असून, हे कर्ज महावितरण टप्प्याटप्प्याने फेडणार आहे. म्हणजे शेतकर्‍याला केवळ पाच टक्के रक्कम भरून सौर कृषिपंप मिळविता येतो. लाभार्थी शेतकर्‍यांच्या सातबारा उतारावर कर्जाचा बोजा लावला जाणार नसल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे. लाभार्थी निवडीसाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीत महावितरणचे अधीक्षक अभियंता हे सदस्य सचिव म्हणून आहेत.