शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
2
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
3
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
4
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
5
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
6
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
7
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
8
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
9
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी
10
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
11
१० हजारांत भारतीय थायलंडमध्ये काय काय करू शकतात? भारताच्या रुपयाची 'बाथ'मध्ये किती किंमत?
12
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
13
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
14
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
15
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
16
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
17
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
18
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
19
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
20
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली

२ लाख ४३ विद्यार्थ्यांचे तयार होणार प्रोग्रेस कार्ड!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 01:39 IST

शालेय विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीस  लागण्यासाठी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत पायाभूत  चाचणी सुरू करण्यात आली. जिल्हय़ातील इयत्ता  दुसरी ते नववीतील विद्यार्थ्यांची शालेय स्तरावर पायाभू त चाचणीला गुरुवारपासून प्रारंभ झाला. या पायाभूत  चाचणीमध्ये मिळणारे गुण शिक्षक अप्लिकेशनमध्ये  ऑनलाइन किंवा ऑफलाइन भरणार आहेत. हे अ िप्लकेशन सरल प्रणालीशी जोडलेले असल्याने ते गुण  आपोआप सरल प्रणालीत जातील. त्यामुळे जिल्हय़ा तील २ लाख ४३ हजार ५00 विद्यार्थ्यांचे प्रोग्रेस कार्ड  तयार होईल. 

ठळक मुद्देपायाभूत चाचणीस प्रारंभ सरल प्रणालीतून कळणार गुण

नितीन गव्हाळे। लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शालेय विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीस  लागण्यासाठी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत पायाभूत  चाचणी सुरू करण्यात आली. जिल्हय़ातील इयत्ता  दुसरी ते नववीतील विद्यार्थ्यांची शालेय स्तरावर पायाभू त चाचणीला गुरुवारपासून प्रारंभ झाला. या पायाभूत  चाचणीमध्ये मिळणारे गुण शिक्षक अप्लिकेशनमध्ये  ऑनलाइन किंवा ऑफलाइन भरणार आहेत. हे अ िप्लकेशन सरल प्रणालीशी जोडलेले असल्याने ते गुण  आपोआप सरल प्रणालीत जातील. त्यामुळे जिल्हय़ा तील २ लाख ४३ हजार ५00 विद्यार्थ्यांचे प्रोग्रेस कार्ड  तयार होईल. वर्गातील प्रत्येक विद्यार्थी, शाळा प्रगत करणे हा पायाभू त चाचण्या घेण्यामागील मुख्य उद्देश आहे. प्राथमिक  शिक्षण विभागाकडून गुरुवारपासून इयत्ता दुसरी ते  नववीतील २ लाख ४३ हजार विद्यार्थ्यांसाठी शालेय स् तरावर पायाभूत चाचणीस सुरुवात झाली आहे. गुरुवारी  प्रथम भाषेचे पेपर घेण्यात आले. शुक्रवारी गणित विषयाचा पेपर घेण्यात आला, तर ११  व १२ सप्टेंबर रोजी इंग्रजी व विज्ञान विषयाचे पेपर  होणार आहेत. इयत्ता दुसरीतील विद्यार्थ्यांचे भाषा व  गणित आणि इयत्ता तिसरी ते पाचवीतील विद्यार्थ्यांचे  भाषा, गणित, इंग्रजी (तृतीय भाषा) विषयाचे पेपर  घेण्यात येत आहेत. पायाभूत चाचणीच्या माध्यमातून  शालेय विद्यार्थ्यांची कोणत्या विषयात प्रगती  समाधानकारक आहे, असमाधानकारक आहे, हे  विद्यार्थ्यांच्या गुण मूल्यांकनावरून ठरविण्यात येणार  आहे. शिक्षकांनी गुणांचे मूल्यांकन केल्यानंतर मूलभूत  क्षमतेत ७५ टक्केपेक्षा कमी गुण व वर्ग पातळीवरील  क्षमतेत ६0 टक्केपेक्षा कमी गुण मिळालेल्या विद्या र्थ्यांच्या विषयनिहाय याद्या बनविण्यात येणार आहेत. अशा अप्रगत मुलांकडे विशेष लक्ष दिले जाईल. प्रगत  विद्यार्थी प्रगत होईपर्यंत दर महिन्याला त्याची चाचणी  घेतली जाणार आहे. पायाभूत चाचणी मराठी, इंग्रजी,  उर्दू माध्यमांच्या विद्यार्थ्यांंना अनिवार्य आहे. लेखी व  तोंडी चाचणी घेऊन प्रत्येक विद्यार्थ्याचे गुण संकेतस् थळावर भरले जातील. त्यानंतरच प्रत्येक विद्यार्थ्याचे  प्रोग्रेस कार्ड तयार होईल. 

गैरप्रकार टाळण्यासाठी समितीपायाभूत चाचणीमध्ये गैरप्रकार टाळण्यासाठी किंवा  विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकेत गुणवाढ होऊ नये, यासाठी  शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांच्या मार्गदर्शनाखाली  एक समिती नेमली आहे. या समितीतील अधिकारी व  सदस्य प्रत्येक शाळेला भेट देऊन पाहणी करीत आहेत.

विद्यार्थी, वर्ग, शाळा प्रगतीचे निकषवाचन, लेखन, संख्याज्ञान, बेरीज, वजाबाकी,  गुणाकार, भागाकार या क्षमतांमध्ये एकूण गुणांच्या ७५  टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळविणारा विद्यार्थी  प्रगत झाला, असे समजण्यात येईल. तसेच वर्गातील  विद्यार्थ्यांंचे एकूण गुणांच्या ७५ टक्के किंवा त्यापेक्षा  जास्त गुण मिळविले आणि शाळेतील सर्व विद्यार्थ्यांंनी  ७५ टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळविले, तर  एकूण गुणांपैकी ६0 टक्केपेक्षा जास्त गुण असल्यास ती  शाळा प्रगत समजली जाईल.

शिक्षकांसाठी प्रोत्साहनपर योजनाएकूण गुणांपैकी सर्व विद्यार्थ्यांंना ४0, ६0, ८0 टक्के पेक्षा जास्त गुण असल्यास शिक्षक व शाळेस गुणवत्ता  वाढीसह उत्तेजनार्थ पत्र, अभिनंदन पत्र देण्यात येणार  आहे. 

पायाभूत चाचणीला गुरुवारपासून सुरुवात झाली. २  लाख ४३ हजार विद्यार्थी चाचणी देत आहेत.  चाचणीदरम्यान गैरप्रकार होऊ नयेत, यासाठी समिती  नेमली आहे.- प्रशांत दिग्रसकर, शिक्षणाधिकारी प्राथमिक