शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

सात सरपंचांसह १९४ ग्रामपंचायत सदस्य अपात्र!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 12:11 IST

जिल्ह्यातील अकोट आणि बार्शीटाकळी तालुक्यातील सात सरपंचांसह १९४ ग्रामपंचायत सदस्यांना अपात्र ठरविण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी २६ जुलै रोजी दिला.

ठळक मुद्देसात सरपंच आणि १९४ ग्रामपंचायत सदस्यांनी विहित मुदतीत (एक वर्षात) जात वैधता प्रमाणपत्र सादर केले नाही. यासंदर्भात संबंधित सरपंच आणि सदस्यांची उपविभागीय अधिकाऱ्यांकडे सुनावणी घेण्यात आली होती.विहित मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर न करणे संबंधित सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांना चांगलेच भोवले आहे.

- संतोष येलकर

अकोला: गत तीन वर्षांच्या कालावधीत घेण्यात आलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये आरक्षित जागांवर निवडून आल्यानंतर विहित मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर केले नसल्याने जिल्ह्यातील अकोट आणि बार्शीटाकळी तालुक्यातील सात सरपंचांसह १९४ ग्रामपंचायत सदस्यांना अपात्र ठरविण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी २६ जुलै रोजी दिला. त्यामुळे जात वैधता प्रमाणपत्र सादर न करणे संबंधित सरपंचांसह ग्रामपंचायत सदस्यांना चांगलेच भोवले.महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम १० (१-अ) नुसार ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत आरक्षित जागेवर निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांनी एक वर्षाच्या कालावधीत संबंधित तहसीलदारांकडे जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे; परंतु सन २०१५-१६, २०१६-१७ व २०१७-१८ या तीन वर्षांच्या कालावधीत जिल्ह्यातील अकोट व बार्शीटाकळी या दोन तालुक्यात घेण्यात आलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये आरक्षित जागांवर निवडून आलेल्या सात सरपंच आणि १९४ ग्रामपंचायत सदस्यांनी विहित मुदतीत (एक वर्षात) जात वैधता प्रमाणपत्र सादर केले नाही. यासंदर्भात संबंधित सरपंच आणि सदस्यांची उपविभागीय अधिकाऱ्यांकडे सुनावणी घेण्यात आली होती. त्यानंतर यासंदर्भात उपविभागीय अधिकाºयांकडून जिल्हाधिकाºयांकडे अहवाल सादर करण्यात आला होता. त्यानुसार विहित मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर न करणाºया अकोट तालुक्यातील पाच सरपंच आणि १०३ ग्रामपंचायत सदस्य तसेच बार्शीटाकळी तालुक्यातील दोन सरपंच आणि ९१ ग्रामपंचायत सदस्य असे एकूण सात सरपंच आणि १९४ ग्रामपंचायत सदस्यांना अपात्र ठरविण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी २६ जुलै रोजी दिला. त्यामुळे विहित मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर न करणे संबंधित सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांना चांगलेच भोवले आहे.अकोट व बार्शीटाकळी तालुक्यातील असे अपात्र ठरले सरपंच-सदस्य!तालुका        सरपंच            सदस्यअकोट           ५                  १०३बार्शीटाकळी   २                   ९१..................................................एकूण           ७                    १९४आदेश अंमलबजावणीचे ‘बीडीओं’ना निर्देश!अकोट तालुक्यातील पाच सरपंच व १०३ ग्रामपंचायत सदस्य आणि बार्शीटाकळी तालुक्यातील दोन सरपंच व ९१ ग्रामपंचायत सदस्यांना जिल्हाधिकाºयांच्या आदेशानुसार अपात्र ठरविण्यात आले आहे. या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश अकोट व बार्शीटाकळी पंचायत समितीच्या गटविकास अधिकाºयांना (बीडीओ) जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ग्रामपंचायत निवडणूक विभागामार्फत सोमवारी निर्गमित करण्यात आले.

 

टॅग्स :Akolaअकोलाgram panchayatग्राम पंचायत