शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
Lufthansa Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
3
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
5
माकडाच्या हाती लागलं नोटांचं बंडल, झाडावर चढून केली ५००-५०० रुपयांच्या नोटांची उधळण, व्हिडीओ व्हायरल
6
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?
7
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
8
Ritual: अकाली मृत्यू येऊ नये म्हणून रोज झोपण्यापूर्वी करा 'ही' दोन ओळींची प्रार्थना!
9
आमदार, खासदार विकत घ्यायला पैसे आहेत पूल बांधायला नाही? मावळ दुर्घटनेवरुन राऊतांचा सवाल
10
Post Office च्या 'या' स्कीममध्ये हवी तितकी खाती उघडू शकता, हमी परताव्यासह मिळेल Tax मध्येही सूट
11
इंग्लंडविरूद्धच्या टेस्टसाठी शार्दुल ठाकूरला 'प्लेइंग ११'मध्ये संधीची शक्यता, 'या' खेळाडूला डच्चू?
12
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
13
Israel-Iran War : भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
14
"आई कुठे काय करते मला सोडायची नव्हती पण...", संजनाची भूमिका साकारलेल्या दिपाली पानसरेने सांगितलं नेमकं कारण
15
"मंत्रालयातून उडी मारावी लागेल अशी वेळ.."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची बिकट अवस्था, म्हणाला- "वय झाल्यामुळे.."
16
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
17
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
18
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
19
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
20
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?

१९८५ लिटर गावठी दारू जप्त

By admin | Updated: May 22, 2014 23:42 IST

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने मूर्तिजापूर तालुक्यातील तीन ठिकाणी छापा घालून बेवारस १९८५ लिटर गावठी दारू जप्त केली.

अकोला : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने मूर्तिजापूर तालुक्यातील तीन ठिकाणी छापा घालून बेवारस १९८५ लिटर गावठी दारू जप्त केली. जप्त केलेली दारू अधिकार्‍यांनी घटनास्थळावरच नष्ट करून टाकली. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला मूर्तिजापूर तालुक्यातील कानडी, पातूर नंदापूर आणि कानडी धरणाच्या बाजूला असलेल्या शेतशिवारामध्ये अवैध गावठी दारूच्या हातभ˜्या सुरू असल्याची माहिती मिळाली. पथकाने बुधवारी दुपारी या तिन्ही ठिकाणी सुरू असलेल्या अवैध गावठी दारू हातभ˜्यांवर छापा घातला. छाप्यादरम्यान तीनही हातभ˜्या बेवारसस्थितीत आढळून आल्या. या ठिकाणावरून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने मोहा सडवा दारू १९८५ लिटर जप्त करून, घटनास्थळावरच नष्ट केली. छाप्यादरम्यान १५ लिटरच्या ११९ डब्यामध्ये आणि २00 लिटरच्या एका बॅरेलमध्ये दारू भरलेली दिसून आली. सर्व मुद्देमाल बेवारस आढळून आला. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपायुक्त पी.एच. पवार यांच्या आदेशावरून व राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक स्वाती काकडे यांच्या मार्गदर्शनात प्रभारी निरीक्षक जी.एम. सिरसाम, दुय्यम निरीक्षक आर.के. फुसे, आर.डी. पाटणे, सहायक दुय्यम निरीक्षक धांडे, सिरसाट, बुलडाण्याचे दुय्यम निरीक्षक मावळे, जवान त्रिपाठी, पटोकार, सोनोने, भांबलकर, महिला कर्मचारी कोमल शिंदे, बबिता गवई यांनी केली.