शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

१८ हजारांवर तक्रारींचे निवारण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 02:17 IST

अकोला : महावितरण ग्राहकांच्या सेवेसाठी नेहमीच कटिबद्ध असते. यासाठी सातत्याने ‘महावितरण आपल्या दारी’सारखे नवनवीन उपक्रम महावितरण राबवित असते. याचाच एक भाग म्हणून महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांनी राज्यभरातील ग्राहकांसाठी ग्राहक संपर्क अभियान राबविण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार राज्यभरात राबविलेल्या ग्राहक संपर्क अभियानात सुमारे १८ हजार ५५५ ग्राहकांच्या तक्रारी व अर्जांचे तत्काळ निराकरण करण्यात आले.

ठळक मुद्देमहावितरणचे ग्राहक संपर्क अभियान १६ परिमंडळांमध्ये १७४६ ग्राहक मेळावे‘महावितरण आपल्या दारी’सारखे नवनवीन उपक्रम 

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : महावितरण ग्राहकांच्या सेवेसाठी नेहमीच कटिबद्ध असते. यासाठी सातत्याने ‘महावितरण आपल्या दारी’सारखे नवनवीन उपक्रम महावितरण राबवित असते. याचाच एक भाग म्हणून महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांनी राज्यभरातील ग्राहकांसाठी ग्राहक संपर्क अभियान राबविण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार राज्यभरात राबविलेल्या ग्राहक संपर्क अभियानात सुमारे १८ हजार ५५५ ग्राहकांच्या तक्रारी व अर्जांचे तत्काळ निराकरण करण्यात आले. महावितरणच्या राज्यभरातील १६ परिमंडळांमध्ये जुलै महिन्यात हे ग्राहक संपर्क अभियान राबविण्यात आले. यांतर्गत राज्यभरात १,७४६ ग्राहक मेळावे घेण्यात आले. या ग्राहक संपर्क अभियानात वीज ग्राहकांसाठी नवीन वीज जोडणी, नावात बदल, वीजभार बदलणे या अर्जांवर कार्यवाही करण्यात आली, तसेच सदोष किंवा चुकीच्या वीज बिलांची दुरुस्ती, सदोष किंवा जळालेले मीटर बदलण्यासह इतर तक्रारीही जागेवरच सोडविण्यात आल्या. राज्यात या अभियानांतर्गत एकूण सुमारे २२ हजार ९६६ तक्रारी व अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी १८ हजार ५५५ तक्रारी, अर्जांचे तत्काळ निराकरण करण्यात आले. उर्वरित ४ हजार ४११ प्रलंबित तक्रारी निर्धारित मुदतीत सोडविण्यात येत असून, त्याची माहिती संबंधित वीज ग्राहकांना देण्यात येत आहे. महावितरणच्या ग्राहक संपर्क अभियानाला संपूर्ण राज्यात वीज ग्राहकांनी मोठा प्रतिसाद दिला, तसेच या अभियानात नवीन वीज जोडणी, इतर वीज सेवेविषयक तक्रारी तत्काळ सोडविण्यात आल्यामुळे वीज ग्राहकांनी समाधान व्यक्त केले आहे.

सर्वाधिक तक्रारी सदोष मीटर रिडिंगच्याराज्यभरात घेण्यात आलेल्या या ग्राहक मेळाव्यांमध्ये एकूण तक्रारींपैकी सर्वाधिक तक्रारी सदोष किंवा चुकीच्या वीज बिलिंगबाबत होत्या. त्यावर महावितरणकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. यासंदर्भात वारंवार चुकीचे रिडिंग घेणार्‍या एजन्सीवर फौजदारी कारवाई करण्याचे निर्देश संजीव कुमार यांनी दिले आहेत.