शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

दिल्लीतील धार्मिक कार्यक्रमातून परतलेल्या जिल्ह्यातील १८ जणांच्या अहवालाकडे लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2020 10:56 IST

स्वॉब नमुणे नागपूर येथे पाठविण्यात आले असून, त्यांचा चाचणी अहवाल काय येता, याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे. 

ठळक मुद्दे१८ जणांना वैद्यकीय उपचारासाठी मंगळवारी रात्री उशीरा सर्वोपचार रुग्णालयात आणले. हे सर्व लोक दिल्लीच्या धार्मिक कार्यक्रमातुन २ मार्च रोजी अकोल्यात परत आल्याचे सांगत आहेत.

 अकोला : वाडेगाव येथील कोरोनाचे १८ संशयित रुग्ण मंगळवारी रात्री  ११.४५ वाजताच्या सुमारास सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. हे सर्व संशयित रुग्ण दिल्लीतील एका धार्मिक कार्यक्रमातून परतल्याची माहिती आहे. या संशयीत रुग्णांचे स्वॉब नमुणे नागपूर येथे पाठविण्यात आले असून, त्यांचा चाचणी अहवाल काय येता, याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वाडेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाºयांनी बाळापूर पोलिसांच्या मदतीने १८ जणांना वैद्यकीय उपचारासाठी मंगळवारी रात्री उशीरा सर्वोपचार रुग्णालयात आणले. यावेळी प्राथमिक वैद्यकीय तपासणीनंतर त्यांचे वैद्यकीय चाचणी नमुने तपासणीसाठी नागपुर येथे पाठविण्याची तयारी करण्यात आली. वैद्यकीय सुत्रांच्या माहितीनुसार, हे सर्व लोक दिल्लीच्या धार्मिक कार्यक्रमातुन २ मार्च रोजी अकोल्यात परत आल्याचे सांगत आहेत. तसेच यातील दोन जण दहा दिवसांपूर्वी साऊदी अरब येथून आले. ते मुळचे वाडेगावातील असून  सौदीत राहत असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा प्रशासनाने त्यांची आरोग्य तपासणी केल्याचे सांगण्यात येत आहे. आता पुन्हा काही लोक सौदी अरेबिया येथून वाडेगावात दाखल झाल्याची माहिती आरोग्य विभागाला मिळाली. त्यामुळे संशयित रुग्ण म्हणून त्यांना आरोग्य तपासणीसाठी अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAkolaअकोला