शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

डेंग्यूसदृश्य तापाने पाच वर्षात घेतले १७५ बळी

By admin | Updated: October 12, 2014 00:41 IST

गत पाच वर्षात राज्यभरात डेंग्यूसदृश्य तापाचे १३ हजार ९८१ संशयीत रुग्ण.

बुलडाणा : गाव परिसरात असलेले घाणीचे साम्राज्य, स्वच्छतेकडे स्थानिक स्वराज्य संस्थांचे दुर्लक्ष आणि वातावरणातील बदलामुळे वाढलेली डासांची उत्पत्ती, आदी कारणांमुळ राज्यभरात डेंग्यूने डोके वर काढले आहे. गत पाच वर्षात राज्यभरात डेंग्यूसदृश्य तापाचे १३ हजार ९८१ संशयीत रुग्ण आढळून आले. त्यापैकी १७५ लोकांचा मृत्यू झाल्याचे आरोग्य विभागाच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे.डासांची उत्पत्ती वाढल्याने मलेरिया, टायफाईड, डायरिया, निमोनिया आणि डेंग्यूसारख्या आजारांनी शहरी आणि ग्रामीण भागातही डोके वर काढत आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयात आणि खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांची संख्या वाढत आहे. यावर्षी हिवताप विभागाने डेग्यूच्या ३५00 संशयीत रुग्णांचे रक्त नमुने तपासणीसाठी विभागीय प्रयोगशाळेकडे पाठविले. त्यापैकी २४ रुग्णांचा मृत्यू झाला. डेंग्यूच्या रुग्णांची वाढती संख्या पाहता, आरोग्य विभागाने प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय अधिकार्‍यांसाठी विशेष कार्यशाळा आयोजित करुन, डेंग्यू नियंत्रणासाठीच्या उ पाययोजनांचे प्रशिक्षणही दिले होते; मात्र तापाच्या साथीवर नियंत्रण मिळविल्याचा दावा करणार्‍या आरोग्य विभागाला डेंग्यूच्या धोक्यावर मात करता आली नाही. डेंग्यूसदृश्य तापाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच असून, आरोग्य विभागासाठी ही चिंतेची बाब आहे. डेंग्यू आणि मलेरियावर मात करायची असेल तर परिसर स्वच्छता ठेवणे आवश्यक आहे. पालिका आणि ग्रामपंचायत स्तरावर स्वच्छतेवर भर देण्यात येत आहे. डेंग्यू आणि हिवताप नियंत्रणासाठी आरोग्य विभाग पुरेपूर काळजी घेत असल्याचे बुलडाणा जिल्हा हिवताप अधिकारी एस.के.वानखेड यांनी सांगीतले.डेंग्यूसदृश्य रूग्ण वर्ष               संशयित रुग्ण                मृत्यू२0१0             १४८९                          0५२0११             ११३८                          २५२0१२             २४२२                          ७३२0१३             ५४३२                          ४८२0१४             ३५00                          २४