शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

शौचालयांच्या माध्यमातून १७ लाख लाटण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2016 02:17 IST

अकोला मनपा आयुक्तांनी दिले चौकशीचे आदेश.

अकोला, दि. १३- स्वच्छ भारत अभियान अंतर्गत उघड्यावर शौच करणार्‍या नागरिकांना वैयक्तिक शौचालय उभारून देण्याच्या नावाखाली महापालिकेच्या आरोग्य निरीक्षकाने तब्बल २८७ बोगस लाभार्थींंची यादी केली. संबंधित लाभार्थींंच्या खात्यात एकूण १७ लाख २२ हजार रुपये जमा होण्यापूर्वीच हा प्रयत्न उधळला गेला. केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियान अंतर्गत मनपा क्षेत्रात वैयक्तिक शौचालय उभारण्याचे महापालिकेला निर्देश आहेत. मनपाच्या स्तरावर आयुक्त अजय लहाने यांनी पात्र लाभार्थींंचा शोध घेण्यासाठी आरोग्य निरीक्षकांवर जबाबदारी सोपवली. आरोग्य निरीक्षकांच्या शोध मोहिमेत १0 हजार ७00 लाभार्थी आढळून आले. शौचालय उभारण्यासाठी केंद्र शासनाकडून १४ कोटींचा निधी प्राप्त झाला असून पात्र लाभार्थींंच्या खात्यात केंद्राचे सहा हजार रुपये व उर्वरित सहा हजार रुपये राज्य शासनाने जमा करण्याची अट आहे. मनपानेदेखील यामध्ये ३ हजार रुपये असे एकूण १५ हजार रुपये लाभार्थींंच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतला. यादरम्यान, प्रभाग क्रमांक २९ मध्ये आरोग्य निरीक्षक जय निंधाने यांची शौचालयाच्या कामातील वादग्रस्त भूमिका समोर येताच त्यांना आयुक्त अजय लहाने यांनी निलंबित केले. त्यांच्या जागेवर आरोग्य निरीक्षक सुरेश पुंड यांची नियुक्ती करण्यात आली. पुंड यांनी पात्र लाभार्थींंच्या यादीची तपासणी केली असता निलंबित आरोग्य निरीक्षक जय निंधाने याने चक्क २८७ बोगस लाभार्थींंंची यादी तयार करून त्यांच्या खात्यात प्रत्येकी ६ हजार रुपये जमा करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला. उपायुक्तांकडे सोपवली चौकशीमनपा आयुक्त अजय लहाने यांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता चौकशीसाठी उपायुक्त समाधान सोळंके यांची नियुक्ती केली होती उपायुक्तांच्या चौकशी अहवालात आरोग्य निरीक्षकावर ठपका ठेवण्यात आला आहे.न्यायालयातून स्थगितीमनपा उपायुक्त समाधान सोळंके यांनी चौकशी अहवाल पूर्ण केल्यानंतर प्रशासनाने आरोग्य निरीक्षक निंधाने यांना नोटीस जारी केली. त्यावर निंधाने यांनी कामगार न्यायालयात धाव घेऊन मनपाच्या संभाव्य कारवाईवर स्थगिती मिळवल्याची माहिती आहे. चौकशी पथकांच्या तपासणीचे काय?मनपाने उभारलेल्या वैयक्तिक शौचालयांच्या तपासणीसाठी आयुक्तांनी झोननिहाय पथकांचे गठन केले होते. यामध्ये पूर्व झोन-सहायक आयुक्त डॉ. दीपाली भोसले, पश्‍चिम झोन-शहर अभियंता इक्बाल खान, उत्तर झोन-जलप्रदायचे कार्यकारी अभियंता सुरेश हुंगे तसेच दक्षिण झोन-सहायक आयुक्त जीतकुमार शेजव यांच्याकडे जबाबदारी सोपवली होती. तपासणीदरम्यान या पथकांना नेमके काय आढळले, याची माहिती उपलब्ध होण्याची गरज आहे.