शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

विहिरींचे अखर्चित १७ कोटी परत जाणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2017 09:27 IST

शासनाने मागितलेल्या हिशेबात उघड झाला अखर्चित निधी

सदानंद सिरसाट । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : आत्महत्याग्रस्त जिल्हय़ांमध्ये सिंचन विहिरींच्या धडक कार्यक्रमाचा गेल्या पाच वर्षात पुरता बोजवारा उडाला आहे. शेतकर्‍यांच्या विहिरींसाठी मिळालेला १७ कोटी रुपयांपेक्षाही अधिक निधी खर्चच झालेला नाही. त्यातून विहिरींची निर्मितीच झाली नसताना आता हा निधी शासनाने जिल्हा परिषदेला मागितलेल्या हिशेबानंतर परत जाण्याची चिन्हे आहेत. शासनाची आर्थिक अडचण शेतकर्‍यांच्या विहिरींचा निधी परत घेऊन सोडवली जाते की काय, अशीच शक्यता निर्माण झाली आहे. शेतकर्‍यांना कर्जमाफी दिल्याने शासनाची आर्थिक कोंडी झाल्याचे सांगितले जात आहे. त्यासाठी खर्चात कपातीचे धोरण राबवत शासनाचा निधी परत बोलावण्याची तयारी झाली आहे. त्यानुसार राज्यातील सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांकडे ३0 जून २0१७ पर्यंत अखर्चित असलेला निधी परत घेतला जात आहे. त्या निधीची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी दिल्यानंतर त्याची पडताळणी स्थानिक लेखा विभाग करत आहे. अकोला जिल्हा परिषदेतील काही विभागाकडे असलेल्या निधीचे आकडे पुढे येत आहेत. त्यामध्ये लघुसिंचन विभागाकडे देण्यात आलेल्या धडक सिंचन विहिरींचा निधी १७ कोटींपेक्षाही अधिक आहे. शासनाने विदर्भातील आत्महत्याग्रस्त जिल्हय़ांमध्ये सिंचन विहिरींचा धडक कार्यक्रम २00९-१0 मध्ये सुरू केला. त्यानुसार प्रत्येक तालुक्यात १ हजार विहिरींचे उद्दिष्टही देण्यात आले; मात्र अनेक कारणांमुळे त्या विहिरींची सुरुवातच झाली नाही. ज्या शेतकर्‍यांनी सुरू केल्या, त्यांच्या विहिरी अद्याप पूर्ण झाल्या नाहीत. पूर्ण झालेल्या विहिरींना शंभर टक्के निधी वाटप झाला नाही. त्यामुळे गेल्या २0१0-११ पासून प्राप्त झालेल्या निधीतून कोट्यवधी अखर्चित आहेत. त्यावेळी जिल्हय़ातील सिंचन विहिरींसाठी प्राप्त असलेला १७ कोटी ८७ लाख आणि १ कोटी २२ लाख रुपये आताही अखर्चित आहे. एवढय़ा मोठय़ा प्रमाणात निधी अखर्चित असताना शेतकर्‍यांच्या विहिरींची अवस्था काय असणार, ही बाब आता शोधाची झाली आहे.