शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मागितले १६२ कोटी; मिळाले १७ कोटी!

By admin | Updated: March 25, 2017 01:55 IST

अतिरिक्त निधीसह १२३ कोटींच्या जिल्हा आराखड्यास मंजुरी

संतोष येलकर अकोला, दि. २४-जिल्ह्यात विविध योजना आणि विकास कामांसाठी जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत अतिरिक्त १६२ कोटींची मागणी जिल्हा नियोजन समितीमार्फत करण्यात आली होती. मागणीच्या तुलनेत जिल्ह्यासाठी १७ कोटी ४0 लाखांचा अतिरिक्त निधी उपलब्ध करून देत, अतिरिक्त निधीसह जिल्हा वार्षिक योजनेच्या १२३ कोटी २४ लाखांच्या आराखड्यास १६ मार्च रोजी शासनाच्या अर्थ खात्याने मंजुरी दिली.शासनाच्या कमाल आर्थिक र्मयादेनुसार सन २0१७-१८ या वर्षीसाठी जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत १0५ कोटी ८४ लाख रुपयांच्या प्रारूप आराखड्यास जिल्हा नियोजन समितीच्या सभेत गत २ जानेवारी रोजी मंजुरी देण्यात आली. त्यामध्ये कृषी व संलग्न सेवा, ग्राम विकास, सामाजिक व सामूहिक सेवा, पाटबंधारे आणि पूरनियंत्रण, ऊर्जा, उद्योग व खाण, परिवहन, सामान्य आर्थिक सेवा व सामान्य सेवा, परिवहन आणि नावीन्यपूर्ण, बळकटीकरण व मूल्यमापनाच्या विकासकामांचा समावेश आहे. मंजूर प्रारूप आराखड्याव्यतिरिक्त जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत योजना आणि विकास कामांसाठी विविध विभागामार्फत १६२ कोटी ९ लाख २९ हजार रुपयांच्या अतिरिक्त निधीची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गत ५ मार्च रोजी नागपूर येथे घेतलेल्या बैठकीत जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत १६२ कोटी ९ लाख २९ हजार रुपयांच्या अतिरिक्त निधीची मागणी जिल्हा नियोजन समितीमार्फत करण्यात आली होती. मागणीच्या तुलनेत जिल्ह्यासाठी १७ कोटी ४0 लाख रुपयांचा अतिरिक्त निधी मंजूर करण्यात आला असून, अतिरिक्त निधीसह १२३ कोटी २४ लाख रुपयांच्या जिल्हा वार्षिक योजनेचा आराखडा शासनाच्या अर्थ विभागामार्फत १६ मार्च रोजी मंजूर करण्यात आला.जलसंधारण, रस्ते, शौचालयांसाठी अतिरिक्त १७ कोटी मंजूर!जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत १६२ कोटी रुपयांच्या अतिरिक्त निधीची मागणी अर्थमंत्र्यांकडे करण्यात आली होती. त्यापैकी १७ कोटी ४0 लाखांचा अतिरिक्त निधी मंजूर करण्यात आला. केंद्र शासन पुरस्कृत जलसंधारण, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना आणि शौचालयांच्या बांधकामांसाठी हा अतिरिक्त निधी मंजूर करण्यात आला.अतिरिक्त निधीची अशी करण्यात आली होती मागणी!क्षेत्र                                  निधी कृषी व संलग्न सेवा             १५ कोटी ४२ लाख 0६ हजार ग्राम विकास                      0५ कोटी ३0 लाख ३४ हजार सामाजिक व सामूहिक सेवा  ७३ कोटी ४८ लाख २२ हजारपाटबंधारे आणि पूरनियंत्रण  0२ कोटी ६१ लाख ६७ हजार ऊर्जा                                 0६ कोटी ..... ......परिवहन                           ५१ कोटी ८१ लाख ६0 हजारसामान्य आर्थिक सेवा         0२ कोटी ५0 लाख ......सामान्य सेवा                    0४ कोटी ९५ लाख ४0 हजार