शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

सिनेट निवडणुकीसाठी १६ हजारांवर पदवीधरांची नोंदणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 01:42 IST

अकोला : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीची तारीख लवकरच जाहीर होणार आहे. आतापर्यंत विद्यापीठाकडे ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने १६ हजार ७१४ पदवीधरांनी नोंदणी केली आहे. महिनाभरापूर्वी पदवीधरांच्या नोंदणीचे काम काही संघटनांच्या प्रतिनिधींमार्फत जोरात सुरू होते. अनेक इच्छुक उमेदवारांनी सिनेट निवडणुकीत उतरण्यासाठी जोरदार मोर्चे बांधणी केली आहे. 

ठळक मुद्देइच्छुकांची मोर्चे बांधणी  लवकरच निवडणुकीची तारीख होणार जाहीर!

नितीन गव्हाळे । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीची तारीख लवकरच जाहीर होणार आहे. आतापर्यंत विद्यापीठाकडे ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने १६ हजार ७१४ पदवीधरांनी नोंदणी केली आहे. महिनाभरापूर्वी पदवीधरांच्या नोंदणीचे काम काही संघटनांच्या प्रतिनिधींमार्फत जोरात सुरू होते. अनेक इच्छुक उमेदवारांनी सिनेट निवडणुकीत उतरण्यासाठी जोरदार मोर्चे बांधणी केली आहे.  अमरावती विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीच्या निमित्ताने पदवीधारकांकडून ऑनलाइन, ऑफलाइन पद्धतीने नोंदणीकृत पदवीधर म्हणून नाव नोंदणीसाठी १६ सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली. यादरम्यान अमरावती विद्यापीठांतर्गत येणार्‍या हजारो पदवीधारकांनी नावाची नोंदणी केली. सिनेट निवडणुकीमध्ये पाचही जिल्हय़ांतून अनेक उमेदवार इच्छुक आहेत. सिनेटच्या निवडणुकीत उतरण्यापूर्वी आवश्यक संख्याबळ आपल्या बाजूने असावे किंवा पदवीधारक मतदारांचा विश्‍वास जिंकण्याच्या उद्देशाने अनेकांनी पदवीधारकांचे नाव नोंदणी करण्यासाठी पुढाकार घेतला होता. एवढेच नाही, तर इच्छुक उमेदवारांसह त्यांच्या कार्यकर्त्यांनीसुद्धा पदवीधारकांच्या घरी जाऊन त्यांचे ऑफलाइन अर्ज भरले होते. यंदा अमरावती आणि अकोला जिल्हय़ात सर्वाधिक नोंदणी झाली आहे. विद्यापीठामध्ये जवळपास ४0 सदस्य असतात; त्यात तीन विद्यापीठ शिक्षक, दहा प्राध्यापक, दहा पदवीधर, दहा प्राचार्य आणि आठ संस्थाचालकांचा समावेश असतो. हे सिनेट सदस्य अमरावती विद्यापीठातील प्रशासकीय कामकाजावर नियंत्रण ठेवण्यासोबतच अर्थसंकल्प, विद्यापीठाची धोरणे यासह वेगवेगळय़ा समस्या सोडविण्यासाठी काम करतात. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर हे सध्या बाहेरगावी असल्यामुळे सिनेट निवडणुकीची तारीख निश्‍चित करण्यात आली नाही. ते परत आल्यानंतरच निवडणुकीची तारीख जाहीर करण्यात येईल. 

नोंदणी केलेल्या पदवीधरांची संख्याअमरावती   ८२६४अकोला     ३७९३बुलडाणा    ७५३यवतमाळ   ३१२९वाशिम       ७७१

सिनेट निवडणुकीसाठी अमरावती विद्यापीठात १६ हजार ७१४ पदवीधारकांची नोंदणी झाली आहे. लवकरच निवडणुकीचा कार्यक्रम आणि निश्‍चित तारीख ठरणार आहे. पाचही जिल्हय़ांमध्ये ६३ मतदान केंद्र निश्‍चित करण्यात आले आहेत. - डॉ. अजय देशमुख, कुलसचिव संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ