शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

अकोट शहरातील १६ धार्मिक स्थळे हटविली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 01:44 IST

अकोट : अकोट शहरातील अतिक्रमीत जागेवर बांधलेली १६ धार्मिक स्थळे १३ नोव्हेंबर रोजी पहिल्या टप्प्यात निष्कासित करण्यात आली. नागरिकांनी दिलेल्या सहकार्यामुळे प्रशासनाने पहिल्या दिवशी ही मोहीम निर्विवादपणे राबविली.

ठळक मुद्देपोलिसांचा बंदोबस्त, नागरिकांचे सहकार्यआजही सुरू राहणार अतिक्रमण हटाव मोहीम

लोकमत न्यूज नेटवर्कअकोट : अकोट शहरातील अतिक्रमीत जागेवर बांधलेली १६ धार्मिक स्थळे १३ नोव्हेंबर रोजी पहिल्या टप्प्यात निष्कासित करण्यात आली. नागरिकांनी दिलेल्या सहकार्यामुळे प्रशासनाने पहिल्या दिवशी ही मोहीम निर्विवादपणे राबविली. न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार शहरातील ४७ अतिक्रमीत असलेली धार्मिक स्थळे निष्कासित करण्यात येत आहेत. या मोहिमेचा प्रारंभ नगर परिषदेमधील हनुमान मंदिर हटवून करण्यात आला. जिल्हा समितीने मंजूर केलेल्या यादीतील सन १९६0 नंतरची अकोट शहरातील ४७ अतिक्रमीत असलेली धार्मिक स्थळे पाडण्याकरिता नगर परिषदने विविध पथके तयार केली होती. सकाळी ५ वाजल्यापासून नगर परिषद व नंतर बस स्थानकावरील मंदिरांचे अतिक्रमण निष्कासित करून दुपारी ४ वाजेपर्यंत डोहोरपुर्‍यातील मरीमाता मंदिर हटवून या मोहिमेला ब्रेक देण्यात आला. धार्मिक स्थळांचे अतिक्रमणे काढत असताना विविध धार्मिक स्थळांचे विश्‍वस्त, पदाधिकारी व परिसरातील नागरिकांनी या मोहिमेला सहकार्य केले. कुठेही वाद-विवाद न करता मोहीम शांततेत पार पडली.  १४ नोव्हेंबर रोजी सकाळपासून पुन्हा ही मोहीम राबविल्या जाणार आहे. या मोहिमेमध्ये नगर परिषद, महसूल विभाग व पोलीस प्रशासन यांमध्ये समन्वय दिसून आला. नगर परिषद मुख्याधिकारी गीता ठाकरे यांनी धार्मिक स्थळे निष्कासित करण्याकरिता मूर्ती स्थलांतरीत पथक, धार्मिक स्थळे निष्कासित पथक, धार्मिक स्थळांचा मलबा उचलण्याचे पथक, अग्निशमक पथक, विद्युत विभाग व धार्मिक स्थळ निष्कासित करण्याबाबतचे राखीव पथक गठीत केले आहे.  मोहिमेदरम्यान अपर जिल्हा पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांनी निष्कासित करीत असलेल्या धार्मिक स्थळी भेट देऊन पोलीस अधिकार्‍यांना सूचना दिल्या. उपविभागीय अधिकारी उदयसिंह राजपूत, प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी गावीत, तहसीलदार विश्‍वनाथ घुगे, मुख्याधिकारी गीता ठाकरे, शहर पोलीस निरीक्षक गजानन शेळके, नायब तहसीलदार विजय खेडकर, सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानोबा फड, पोलीस उपनिरीक्षक शरद माळी, उपमुख्याधिकारी दिनकर शिंदे, बांधकाम अभियंता स्नेहलकुमार बोमकंटीवार, न.प.प्रशासन अधिकारी नंदकिशोर हिंगणकर, स्वच्छता निरीक्षक प्रदीप रावणकार, पाणी पुरवठा पर्यवेक्षक रोशन कुमरे, स्वच्छता निरीक्षक चंदन चंडालीया, अग्निशमन पर्यवेक्षक रुपेश जोगदंड, विद्युत परिवेक्षक नंदन गेडाम, संजय बेलुरकर, मिलिंद दिवाळकर, मंडळ अधिकारी सायरे, तलाठी दिनेश मोहोकार, विशाल शेरेकर, रतन, जांभुरकर तसेच पथक प्रमुख आदींनी चोख बंदोबस्त ठेवला.

हटवण्यात आलेली धार्मिक स्थळे  हनुमान मंदिर (बस स्टॅन्ड), हनुमान मंदिर (इंदिरा नगर), कालंका मंदिर (इंदिरा नगर), सीतलामाता मंदिर (एसडीओ निवासस्थान जवळ), दुर्गा माता मंदिर (सिंधी कॅम्प), विध्यांचल देवी मंदिर( अग्रसेन चौक), हनुमान मंदिर (गाजी प्लॉट), शंकरजी मंदिर (अंजनगाव रोड), शिव मंदिर(कराळे प्लॉट), हनुमान मंदिर (बर्डे प्लॉट), गौतम बुद्ध पुतळा (सती मैदान), गुणंवत महाराज मंदिर (सती मैदान), शिव मंदिर (आंबोडी वेस), हनुमान मंदिर (डोहोरपुरा), मरीमाता मंदिर (डोहोरपुरा), गजानन मंदिर (देशपांडे वेटाळ).