शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

१६ लाखांच्या दरोड्याचे बिंग आलिशान जिप्सीमुळे फुटले!

By admin | Updated: July 13, 2017 01:08 IST

अकोला : स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या सरकारी बगीच्याजवळ २०१५ मध्ये एका व्यापाऱ्याची बॅग लुटून तब्बल १६ लाख रुपयांची रोकड पळविल्याची घटना घडली होती...

सचिन राऊत। लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या सरकारी बगीच्याजवळ २०१५ मध्ये एका व्यापाऱ्याची बॅग लुटून तब्बल १६ लाख रुपयांची रोकड पळविल्याची घटना घडली होती. दोन वर्षांपासून प्रकरण शांत असताना, एका आलिशान जिप्सीवरून रोकड पळविणाऱ्यांमध्येच चर्चा झाली अन् या प्रकरणाचे बिंग फुटले. जुने शहरातील दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे.सरकारी बगीच्याजवळून जात असताना व्यापाऱ्याची एका टोळक्याने १६ लाख रुपयांची बॅग पळविली होती. त्यानंतर सिटी कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल करून प्रकरणाचा तपास सुरू केला. मात्र, शोध लागला नाही. या लुटमारीनंतर १६ लाख रुपयांची हिस्सेवाटणी करण्यात आली. या टोळीतील म्होरक्याने त्याच्या साथिदारांना बॅगमध्ये केवळ आठ लाखच असल्याचे सांगत, आधीच आठ लाख रुपयांवर डल्ला मारून घेतला. त्यानंतर उर्वरित आठ लाखांमधील दीड लाख एका खास साथीदाराला दिले, तर उर्वरित ५० हजारांप्रमाणे अन्य साथीदारांना वाटप केले. या वाटपानंतर प्रकरण शांत झाले; मात्र टोळीच्या म्होरक्याने काही महिन्यातच वेगळी जिप्सी कार खरेदी केली आणि यातच त्याच्या साथीदारांच्या भुवया उंचावल्या. टोळीचा म्होरक्या वगळता अन्य साथीदार एका बारमध्ये बसल्यानंतर हा प्रकार जोरात बोलल्या गेला, त्यानंतर सदर प्रकरणाचे बिंग फुटले. पोलिसांना हा प्रकार माहिती होताच टोळीचा म्होरक्या आणि दीड लाखांची रक्कम घेणारा साथीदार दोघांना ताब्यात घेतले. दोघांची कसून चौकशी सुरू असतानाच काही मोठे नावे समोर येणार असल्याचा संशय व्यक्त करण््यात येत आहे. ‘बाजीराव’ने तीन तास धुलाई!दोघांमधील एक पहीलवान असल्याने त्याची स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी तब्बल दोन ते तीन तास धुलाई केल्याची माहिती आहे. यामध्ये ताब्यात घेतलेल्या युवकाने अचानकच डोळे बंद केले. त्यामुळे मरणासन्न अवस्थेतच त्याला पोलिसांनी खुल्या जागेत टाकले. बरेच वेळ हालचाल न झाल्याने पोलिसांमध्ये चर्चा सुरू झाली. मात्र, दोन तासांनंतर हा युवक उठल्याने पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.तक्रार तीन लाखांचीव्यापाऱ्याच्या बॅगमधून तब्बल १६ लाख पळविल्या गेले. मात्र म्होरक्याने ही रक्कम केवळ आठ लाख दाखविली. तर पोलीसात दाखल असलेल्या तक्रारीत केवळ ३ लाख १५ हजार चोरी गेल्याचे नमूद आहे. त्यामुळे उर्वरीत रक्कम कमी करण्यामागे काय गोडबंगाल आहे, याचा शोध घेण्याची आवश्यकता आहे.