शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

१५0 दिव्यांगांना दिले जगण्याचे बळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 01:54 IST

अकोला : जन्मत: आणि अपघाती नशिबी आलेल्या विदर्भातील दिव्यांगांना समाजात सन्मानाने उभे करण्याचे काम गत तीन वर्षांपासून अकोल्यातील अनेक सामाजिक कार्यकर्ते करीत आहेत. यंदाही विदर्भातील १५0 दिव्यांगांना जगण्याचे बळ देण्याचा प्रयत्न महावीर सेवा सदन आणि रोटरी क्लब ऑफ अकोला मिडटाउनच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. विदर्भाच्या कानाकोपर्‍यातून आलेल्या या दिव्यांगांना कृत्रिम-हात पाय देण्याच्या उपक्रमाचे सर्वत्र तोंडभरून कौतुक होत आहे.

ठळक मुद्देमहावीर सेवा सदनरोटरी मिडटाउनचा उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जन्मत: आणि अपघाती नशिबी आलेल्या विदर्भातील दिव्यांगांना समाजात सन्मानाने उभे करण्याचे काम गत तीन वर्षांपासून अकोल्यातील अनेक सामाजिक कार्यकर्ते करीत आहेत. यंदाही विदर्भातील १५0 दिव्यांगांना जगण्याचे बळ देण्याचा प्रयत्न महावीर सेवा सदन आणि रोटरी क्लब ऑफ अकोला मिडटाउनच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. विदर्भाच्या कानाकोपर्‍यातून आलेल्या या दिव्यांगांना कृत्रिम-हात पाय देण्याच्या उपक्रमाचे सर्वत्र तोंडभरून कौतुक होत आहे.सलग तीन वर्षांपासून अकोल्यात हा प्रयोग सुरू असून, विदर्भातील दिव्यांग या शिबिराचा लाभ घेत आहेत. यंदाही हे शिबिर अकोल्यातील दगडीपुलाजवळच्या ओसवाल भवनात १७ ते २४ सप्टेंबर या कालावधीत घेण्यात आले. विदर्भातील चंद्रपूर, वर्धा,जळगाव, बल्लारशहा, वाशिम, बुलडाणा आणि अकोला जिल्ह्यातील जवळपास १५0 दिव्यांगांनी या शिबिराचा लाभ घेतला. दूर-दुरून येऊन दिव्यांगांनी येथून कृत्रिम हातपाय बसवून घेतले. यावेळी दिव्यांगांच्या चेहर्‍यावरील हास्य सामाजिक कार्यकर्त्यांना अधिक प्रेरणा देणारे ठरले. गेल्या तीन वर्षांपासून दिव्यांगांना जगण्याचे बळ देण्याच्या या उपक्रमात नवल जैन, प्रकाश लोढिया, गिरीष राठी, राहुल गोसर, राजेश बिलाला, श्याम ठाकूर, रश्मी शहा, राजेश अग्रवाल, दीपेश शहा, आनंद चांडक, राजू बजाज, वैभव शहा, प्रशांत झांबड, मनोज खंडेलवाल, समीर शहा, हेमंत कटारिया, सुनील जांगीड, राजेश पटवारी, विक्रम गोलेच्छा, प्रशांत मानधणे सातत्याने प्रयत्न करीत आहेत.

विष्णूला मिळाला पाय!बल्लारशहा येथील तीन वर्षीय विष्णू संतने एका रेल्वे अपघातात पाय गमाविला होता. आईशिवाय जगण्याचा कोणताही आधार नसलेल्या विष्णूला या शिबिरात कृत्रिम पाय दिला गेला. मोलमजुरी करून दिनचर्या चालविणार्‍या या मध्यमवर्गीय मायलेकांना कृत्रिम पायाने जगण्याचे बळ दिले आहे.

रोहितही चालत गेला..!तेल्हारा येथील सहाव्या वर्गातील रोहित गणेश काकडे या चिमुकल्याने बोन कॅन्सरने पाय गमाविला होता. उपचाराअंती तो आता चांगला झाला. मात्र, त्याच्या पायाला जुळेल, असे कृत्रिम पाय मिळाले नव्हते. मात्र, अकोल्याच्या या शिबिरात रोहितही गावाकडे सर्वसामान्य मुलासारखा चालत गेला.-