शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

जलयुक्तसाठी जिल्ह्यातील १४४ गावांची होणार निवड

By admin | Updated: May 1, 2017 03:16 IST

विभागात १,०४१ गावे : विभागीय समन्वय समितीचा निर्णय

अकोला: जलयुक्त शिवार अभियानाच्या अंमलबजावणीसाठी आराखड्याला मान्यता देणाऱ्या विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समन्वय समितीने पाच जिल्ह्यातून १,०४१ गावांची निवड करण्यास मान्यता दिली आहे. त्यानुसार अकोला जिल्ह्यात १४४ गावांची निवड केली जाणार आहे. शासनाने जलयुक्त शिवारच्या प्रभावी अंमलबजावणी आणि परिणामकारक अंमलबजावणीसाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समन्वय समिती गठित केली आहे. ही समिती आराखड्यास मान्यता देऊन कामांचा अहवाल शासनाला सादर करते. अमरावती विभागीय समितीची बैठक २४ एप्रिल रोजी पार पडली. या समितीने विभागातील पाचही जिल्ह्यातील गावांची संख्या निश्चित केली. २०१७-२०१८ मध्ये या गावांमध्ये जलयुक्त शिवारची कामे केली जाणार आहेत. गेल्या दोन वर्षात म्हणजे २०१५-१६ आणि २०१६-१७ या वर्षात जिल्ह्यातून निवड झालेल्या गावांचे उद्दिष्ट वजा करून नवे उद्दिष्ट ठरवण्यात आले आहे. शिल्लक असलेल्या गावांपैकी केवळ २१ टक्केच गावांची निवड करण्यात आली. सात दिवसात अंतिम यादीविभागीय समितीने गाव निवडीचे उद्दिष्ट ठरवून दिले आहे. त्यानुसार जिल्हास्तरीय समितीने सात दिवसांत गावांची अंतिम यादी निश्चित करण्याचे निर्देश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. त्यानुसार जिल्ह्यातील गावांची निवड लवकरच होणार आहे. ७५ टक्के गावे अद्यापही शिल्लकजलयुक्त शिवार अभियानात गेल्या दोन वर्षात सर्वच जिल्ह्यात निवड आणि कामे झालेल्या जिल्ह्याची संख्या केवळ २५ टक्के आहे. चालू वर्षात एकूण ७५ टक्के गावांमध्ये कामे होण्याची प्रतीक्षा आहे. त्यापैकी २१ टक्के गावांची निवड करण्यात आली आहे. अद्यापही पन्नास टक्क्यापेक्षा अधिक गावे शिल्लक राहणार आहेत. --