शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

मनपाचे १४१ कंत्राटी कर्मचारी दोन महिन्यांपासून आदेशाविना सेवारत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2018 13:17 IST

कोणतेही आदेश नसताना अकोला महापालिकेत १४१ कर्मचारी कार्यरत आहे.

अकोला: अकोला महापालिकेतील विविध विभागातील कामकाजासाठी गत १५ ते १८ वर्षांपासून १४१ कर्मचारी कंत्राटी करारावर कार्यरत आहे. दरवर्षी त्यांना नव्याने आदेश देऊन सेवेत घेण्यात येते. यंदा मात्र दोन महिने उलटूनही या कर्मचाºयांचा करार झालेला नाही. कोणतेही आदेश नसताना अकोला महापालिकेत १४१ कर्मचारी कार्यरत आहे.अकोला महापालिकेतील सुरक्षा विभाग, वाहन चालक विभाग, अग्निशमन विभाग, अतिक्रमण विभागात १४१ कर्मचारी गेल्या १५ ते १८ वर्षांपासून सातत्याने कार्यरत आहे. या कर्मचाºयांनी कुठेही संघटना करू नये, असे त्यांच्या नोंदी करारात नमूद आहे. त्यामुळे हे कर्मचारी कायदेशीर बांधलेले आहे. गेल्या दोन महिन्यांपासून या कर्मचाºयांना पुढील नेमणुकीचा आदेश महापालिकेने दिलेला नसताना ते कार्यरत आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाचे अतिक्रमण विभागाचे आणि नगररचनाचे अधिकारी-कर्मचारी आहे. शहरातील अनधिकृत अतिक्रमण पाडणारे कर्मचारीच सध्या अनधिकृत आहे. त्यामुळे काही कर्मचाºयांवर या दरम्यानची कारवाई अंगलटदेखील येऊ शकते. अकोला महापालिकेच्या आमसभेत तातडीने नवीन नेमणुकीचे आदेश देण्याची गरज आहे; पण अजून तरी आमसभेत हा विषय आलेला नाही. महापालिका पदाधिकाºयांचे लक्ष वेधावे म्हणून काही कंत्राटी कर्मचारी-अधिकाºयांनी विनंती केली आहे; मात्र अजून तरी त्यांना न्याय मिळालेला नाही. आउट सोर्सिंग सेवेतील कर्मचारी वेगळे१४१ कंत्राटी कर्मचाºयांसारखा कायदेशीर पेच भविष्यात येऊ नये म्हणून महापालिका प्रशासनाने काही कर्मचाºयांना आउट सोर्सिंग पद्धतीने कामावर घेतले आहे. या कर्मचाºयांचा आणि महापालिकेचा थेट संबध नाही. कंत्राटदारांशी झालेल्या करारावर हे कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांना केवळ कंत्राटदाराकडेच दाद मागता येते.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका