शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

१४ वर्षांपूर्वी बेपत्ता झालेला युवक आईच्या स्वाधीन

By admin | Updated: February 4, 2017 02:38 IST

खदान पोलिसांची कामगिरी, केरळमध्ये होता मुलगा.

अकोला, दि. 0३- शहरातील दिवेकर आखाडा परिसरातील रहिवासी असलेला तसेच गतिमंद मुलगा २00३ मध्ये म्हणजेच १४ वर्षांपूर्वी अचानक बेपत्ता झाला होता. या मुलाची माहिती केरळ येथील एका अधिकार्‍याने २५ दिवसापूर्वी खदान पोलिसांना दिल्यावर पोलिसांनी या माहितीचा मागोवा घेत सदर मुलाचा शोध लावून शुक्रवारी रात्री त्याला आईच्या स्वाधीन केले. सदर मुलगा हा गत १४ वर्षांपासून केरळमधील कालीकतमध्ये एका ह्यएनजीओह्णच्या बालसुधार गृहात राहत होता.दिवेकर आखाडा परिसरातील रहिवासी संचित पुंडलीक डांगे हा मुलगा काही प्रमाणात गतिमंद आहे. २00३ मध्ये तो १४ वर्षांचा असताना त्याचे वडील पुंडलीक सूर्यभान डांगे यांचे निधन झाले. आधीच गतिमंद असलेला संचित वडिलांच्या निधनाने खचला आणि अचानकच रेल्वे स्टेशनवर जाउन तो एका रेल्वेने थेट केरळमध्ये गेला. केरळमधील कोझीकोडे जिल्हय़ातील मारीकुन्नू तालुक्यातील ऐवाचुर या गावात तो विमनस्क अवस्थेत फिरत असताना तो ह्यआशाभवन वेलीमाडकुन्नूह्ण या सामाजिक संस्थेच्या पदाधिकार्‍यांना भेटला. या संस्थेच्या पदाधिकार्‍यांनी त्याला संस्थेच्याच आश्रमात ठेवून उपचार सुरू केले. विचारपूस करण्याचा प्रयत्न केला; मात्र भाषेची प्रचंड अडचण असल्याने आणि तो गतिमंद असल्याने बराच कालावधी निघून गेला. या कालावधीत संचित हा मल्याळम भाषा शिकला. त्यामुळे त्याने अकोला येथील रहिवासी असल्याचे सांगून सर्व माहिती संस्थेच्या पदाधिकार्‍यांना दिली; मात्र पदाधिकार्‍यांनाही अकोल्याविषयी माहिती नसल्याने त्यांनी केरळमधील आयबीचे अधिकारी शिवम यांच्याशी संपर्क केला. शिवम यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून खदानचे ठाणेदार गजानन शेळके यांच्याशी एक महिन्यापूर्वी संपर्क केला. यावरून शेळके यांनी सदर प्रकरणी खदानचे कर्मचारी जगदीश इंगळे यांना कामाला लावले. इंगळे यांनी मुलाच्या आईचा शोध घेऊन प्रकरणाला गती दिली. केरळमधील संबंधित संस्थेशी बोलणे करून दुर्गाबाई डांगे यांना केरळमध्ये रवाना केले. शुक्रवारी रात्री दुर्गाबाई या मुलाला घेऊन अकोल्यात परतताच त्यांनी खदान पोलीस स्टेशन गाठून ठाणेदार गजानन शेळके, जगदीश इंगळे आणि सिव्हिल लाइन्सचे उमेश आणि दिलीप उमाळे यांचे आभार मानले.या माय-लेकांची भेट घालून देण्यात खदान पोलिसांचे मोठे श्रेय आहे. यामध्ये जगदिश इंगळे या कर्मचार्‍यानेही दिवस-रात्र मेहनत घेऊन मुलाला आईच्या स्वाधीन करण्याचे मोठे काम केले. कोणतीही माहिती नसताना त्याच्या आईचा अकोल्यातून शोध घेऊन त्यांनी ही कामगिरी केली. दरम्यान केरळमधील संचित यास त्याच्या आईच्या स्वाधीन करण्यासाठी खदान पोलिसांनी अथक परिश्रम घेतले; मात्र केवळ बेपत्ता असल्याची नोंद सिव्हिल लाइन्स पोलीस स्टेशनमध्ये दाखल असल्याने सदर मुलगा अकोल्यात येण्यापूर्वीच श्रेय लाटण्यासाठी माध्यमांना अर्धवट माहिती देऊन प्रसिद्धी मिळविण्याचे काम सिव्हिल लाईन पोलसांनी केले. खदान पोलिसांनी दिवस-रात्र परिश्रम घेतले; मात्र मुलगा व आईची भेट झाल्यानंतरच माहिती माध्यमांना देण्याचे ठरवले; परंतु सिव्हिल लाइन्स पोलिसांनी मिसिंग दाखल असताना शोध घेण्याची तसदी घेतली नाही; परंतु माध्यमांना अर्धवट माहिती देऊन प्रसिद्धी मिळवून घेतली.