शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
5
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
6
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
7
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
8
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
9
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
10
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
11
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
12
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
13
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
14
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
15
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
16
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
17
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
18
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
19
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
20
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर

वीज चोरीचे गुन्हे दाखल करण्यासाठी राज्यात आता १३२ पोलीस ठाणी!

By atul.jaiswal | Updated: March 7, 2018 13:56 IST

अकोला : राज्यातील महावितरणची सहा पोलीस ठाणी बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता राज्याच्या गृह विभागाने वीज चोरीच्या प्रकरणांना आळा घालण्यासाठी व वीजचोरीचे गुन्हे दाखल करण्यासाठी राज्यात १३२ पोलीस ठाण्यांमध्ये वीज चोरीचे गुन्हे दाखल करण्यास परवानगी दिली आहे.

ठळक मुद्देया १३२ पोलीस ठाण्यांमध्ये महावितरण, अधिकृत फ्रेंचाईजी वितरण किंवा वितरण परवानाधारक यांच्याशी चोरीसंदर्भात घडलेल्या गुन्ह्यांशी संबंधित प्रथम खबरी अहवाल दाखल करता येईल. मोठ्या शहरांमध्ये पाच पोलीस ठाण्यांना वीज चोरीबाबतचे गुन्हे दाखल करण्याची परवानगी देण्यात आली आहे. महावितरणच्या अकोला परिमंडळात अकोला, बुलडाणा व वाशिम या तीन जिल्ह्यांमधील वीज चोरीच्या प्रकरणांसाठी आठ पोलीस ठाण्यांची निवड करण्यात आली आहे.

अकोला : राज्यातील महावितरणची सहा पोलीस ठाणी बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता राज्याच्या गृह विभागाने वीज चोरीच्या प्रकरणांना आळा घालण्यासाठी व वीजचोरीचे गुन्हे दाखल करण्यासाठी राज्यात १३२ पोलीस ठाण्यांमध्ये वीज चोरीचे गुन्हे दाखल करण्यास परवानगी दिली आहे. यामध्ये विदर्भातील ११ जिल्ह्यांसाठी ५१ पोलीस ठाण्यांची निवड करण्यात आली आहे.यासंदर्भातील एक परिपत्रक गृह विभागाने २८ फेब्रुवारी रोजी जारी केले आहे. या १३२ पोलीस ठाण्यांमध्ये महावितरण, अधिकृत फ्रेंचाईजी वितरण किंवा वितरण परवानाधारक यांच्याशी चोरीसंदर्भात घडलेल्या गुन्ह्यांशी संबंधित प्रथम खबरी अहवाल दाखल करता येईल. साधारणत: प्रत्येक जिल्ह्यात तीन ते चार पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करता येणार. मोठ्या शहरांमध्ये पाच पोलीस ठाण्यांना वीज चोरीबाबतचे गुन्हे दाखल करण्याची परवानगी देण्यात आली आहे. यापूर्वीचे महावितरणचे सहा पोलीस ठाणे बंद करण्यात आले आहेत. वीज चोरीच्या माध्यमातून सुमारे १० टक्के वितरण हानी होत आहे. राज्यात अहमदनगर जिल्ह्यात ४ पोलीस ठाणे, औरंगाबाद जिल्ह्यात ५, बीड जिल्ह्यात ४, ठाणे जिल्ह्यात १०, धुळे जिल्ह्यात ३, हिंगोलीत ३, नांदेड जिल्ह्यात ४ पोलीस ठाणे, नाशिक जिल्ह्यात ५, जालन्यात ३, परभणी जिल्ह्यात ३, उस्मानाबाद ३, लातूर ३, नागपूर शहर व ग्रामीण मिळून ७, पोलीस ठाण्यांमध्ये तक्रार दाखल करता येणार आहे.पुणे शहर व ग्रामीण मिळून ७ पोलीस ठाण्यांमध्ये वीज चोरीची तक्रार दाखल करता येणार आहे. सोलापूर जिल्ह्यात ४, अकोला ३, अमरावती ४, भंडारा २, बुलडाणा २, चंद्रपूर ३, गडचिरोली २, गोंदिया जिल्ह्यात ३, जळगाव जिल्ह्यात ४, कोल्हापूर जिल्ह्यात २, नंदूरबार ३, पालघर ६, रायगड ४, रत्नागिरी २, सांगली ३, सातारा ३, सिंधुदुर्ग २, वर्धा २, वाशिम ३, यवतमाळ ४, मुंबई शहर व उपनगरात पोलीस ठाण्यांमध्ये वीज चोरीचे गुन्हे दाखल करण्यात येतील, असे परिपत्रकात म्हटले आहे.अकोला परिमंडळात आठ पोलीस ठाणीमहावितरणच्या अकोला परिमंडळात अकोला, बुलडाणा व वाशिम या तीन जिल्ह्यांमधील वीज चोरीच्या प्रकरणांसाठी आठ पोलीस ठाण्यांची निवड करण्यात आली आहे. अकोला जिल्ह्यातील अकोट फैल, बाळापूर आणि अकोट ही पोलीस ठाणी आहेत. बुलडाण्यात बुलडाणा शहर आणि खामगाव ही पोलीस ठाणी, तर वाशिम जिल्ह्यासाठी वाशिम, मंगरुळपीर आणि कारंजा येथील पोलीस ठाणी निवडण्यात आली आहेत.वीज चोरीची प्रकरणे दाखल करण्यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी पोलीस ठाणी उपलब्ध झाल्यामुळे या प्रकरणांचा निपटारा करण्याची प्रक्रिया गतिमान होईल. त्यामुळे वीज चोरट्यांमध्ये वचक निर्माण होऊन, वीज चोरीला आळा बसेल.

- अरविंद भादीकर, मुख्य अभियंता, अकोला परिमंडळ, महावितरण.

 

टॅग्स :mahavitaranमहावितरणPolice Stationपोलीस ठाणेAkolaअकोला