शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

अकोल्यात आढळल्या १.३२ लाख कुणबी जातीच्या नोंदी

By संतोष येलकर | Updated: November 18, 2023 18:09 IST

१७ नोव्हेंबरपर्यंत १ लाख ३२ हजार १६६ कुणबी जातीच्या नोंदी आढळल्या आहेत.

अकोला : मराठा समाजाला मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र देण्याच्या अनुषंगाने अभिलेखांची तपासणी तसेच नोंदी जिल्हा प्रशासनाकडून तपासण्यात येत आहेत. जिल्ह्यात १७ नोव्हेंबरपर्यंत १ लाख ३२ हजार १६६ कुणबी जातीच्या नोंदी आढळल्या आहेत.

मराठा समाजाला मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र देण्याची कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी राज्य शासनामार्फत न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली. या समितीची व्याप्ती संपूर्ण राज्यासाठी वाढविण्यात आली आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष कक्ष स्थापन करण्यात आला असून, जिल्हा व तालुका स्तरावरील सर्व कार्यालयांमध्ये कुणबी जातीसंदर्भातील अभिलेख तपासणीची कार्यवाही सुरू आहे.९,८२,३५० अभिलेख नोंदी तपासल्या

जिल्ह्यातील तहसील कार्यालये, भूमी अभिलेख कार्यालयाच्या स्तरावर पेरेपत्रक, कूळ नोंदवही, हक्क नोंदपत्रक, कोतवाल बुक नक्कल, टिपण बुक, योजना बुक तपासणीची कार्यवाही युद्धपातळीवर होत आहे. सातही तालुक्यांमध्ये १९४८ ते १९६७ या कालावधीतील एकूण संख्या ५ लाख ३९ हजार ७०३ अभिलेख नोंदी तपासण्यात आल्या. त्यात कुणबी जातीच्या ७३ हजार ७७९ नोंदी आढळल्या. त्याचप्रमाणे, १९४८ पूर्वीच्या ४ लाख ४२ हजार ६४७ नोंदी तपासण्यात आल्या. त्यात कुणबी जातीच्या ५८ हजार ३८७ नोंदी आढळून आल्या.तपासणी वेळेत पूर्ण करा - जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

जिल्ह्यातील शैक्षणिक विभाग, पोलिस विभाग, कारागृह विभाग, जिल्हा उपनिबंधक व इतर सर्व संबंधित यंत्रणांनी अभिलेखांची तपासणी व अभिलेख उपलब्ध करून देण्याबाबतची कार्यवाही विहित कालावधीत पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेत.

टॅग्स :Akolaअकोला