शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

१३ ग्रामपंचायतींचे १५४ सदस्य झाले बाद !

By admin | Updated: September 1, 2016 02:47 IST

अकोला महानगरपालिका हद्दवाढीचा बसला फटका

संतोष येलकर अकोला, दि. ३१: महानगरपालिका हद्दवाढीत शहरानजिकची २४ गावे समाविष्ट करण्यात आली. त्यामध्ये हद्दवाढीत पूर्णत: क्षेत्र गेलेल्या १३ ग्रामपंचायती जिल्ह्यातून बाद करण्यात आल्याने, या ग्रामपंचायतींच्या १५४ सदस्यांचे सदस्यत्वही गेले आहे.अकोला महानगरपालिकेची हद्दवाढ करण्यात येत असल्याची अधिसूचना मंगळवारी शासनामार्फत जाहीर करण्यात आली. मनपाच्या हद्दवाढीत २४ गावे समाविष्ट करण्यात आली. हद्दवाढीत समाविष्ट गावांचे क्षेत्र जिल्ह्यातून वगळण्यात आले. त्यामध्ये हद्दवाढीत पूर्ण क्षेत्र समाविष्ट करण्यात आलेल्या १३ ग्रामपंचायती बाद झाल्या. ग्रामपंचायतींचे क्षेत्र हद्दवाढीत गेल्याने, संबंधित १३ ग्रामपंचायतींच्या १५४ सदस्यांचे सदस्यत्वही गेले आहे. त्यामध्ये सरपंच आणि उपसरपंचांचे पदही गेले आहे. त्यामुळे महानगरपालिका हद्दवाढीचा ग्रामपंचायतींच्या सदस्यांना फटका बसला आहे.या आहेत बाद झालेल्या ग्रामपंचायती!१) अकोली खुर्द २) हिंगणा ३) शिवर ४)मलकापूर ५) शिवापूर ६: डाबकी ७) सोमठाणा ८) गुडधी ९) उमरी १0) शिवणी ११) खरप बु. १२) शिलोडा १३) खडकी बु. ग्रामपंचायत कर्मचा-यांना सामावून घेणार मनपात!मनपा हद्दवाढीत १३ ग्रामपंचायती समाविष्ट करण्यात आल्या. त्यामुळे या ग्रामपंचायतींच्या कर्मचार्‍यांना महानगरपालिकेच्या आस्थापनेवर समावून घेण्यात येणार आहे. यासंबंधीची प्रक्रिया लवकरच जिल्हा परिषद आणि मनपा प्रशासनामार्फत सुरू करण्यात येणार आहे.अकोला पंचायत समितीचे सदस्य संख्याबळ झाले २४!अकोला पंचायत समितीच्या खडकी बु. मलकापूर भाग-२, उमरी प्र.बाळापूर आणि शिवणी या चार गणांचे क्षेत्र पूर्णत: मनपा हद्दवाढीत समाविष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे अकोला पंचायत समितीचे सभापती तथा उमरी प्र.बाळापूर गणाचे सदस्य अरुण परोडकर, उपसभापती तथा खडकी बु. गणाचे सदस्य गणेश अंधारे, मलकापूर भाग-२ गणाचे सदस्य विशाल पाखरे आणि शिवणी गणाचे सदस्य विलास जगताप इत्यादी चार सदस्यांना ३0 ऑगस्टपासून सदस्य पदावरुन दूर करण्यात आले आहे. चार सदस्यांचे सदस्यत्व रद्द झाल्याने, एकूण २८ सदस्य संख्या असलेल्या अकोला पंचायत समितीचे सदस्य संख्याबळ आता २४ झाले आहे.ग्रामपंचायतींचे खाते गोठविण्याचा आदेश!मनपा हद्दवाढमध्ये समाविष्ट १३ ग्रामपंचायतींच्या आर्थिक व्यवहाराचे बँक खाते पुढील आदेशापर्यंत गोठविण्याचा आदेश जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण विधळे यांनी बुधवारी अकोला पंचायत समितीच्या गटविकास अधिकार्‍यांना दिला. त्यानुसार मनपा हद्दवाढीत समाविष्ट संबंधित ग्रामपंचायतींचे बँक खाते गोठविण्यात येणार आहे.ग्रामपंचायतनिहाय बाद झालेल्या सदस्यांची संख्याअकोली खुर्द 0७, हिंगणा 0७, सोमठाणा 0७, शिवणी १७, शिवर १५, मलकापूर १७, शिवापूर 0७, डाबकी 0७, गुडधी १३, उमरी १८, खरप बु. १५, शिलोडा 0९, खडकी बु. १५. एकूण -१५४