शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

बारावी परीक्षेत दोन कॉपीबहाद्दर निलंबित!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2019 13:22 IST

अकोला: उच्च माध्यमिक (बारावी) परीक्षेला गुरुवारपासून शांततेत सुरुवात झाली. गुरुवारी इंग्रजी विषयाच्या पेपरदरम्यान भरारी पथकांनी परीक्षा केंद्रांवर धाडी घातल्या.

अकोला: उच्च माध्यमिक (बारावी) परीक्षेला गुरुवारपासून शांततेत सुरुवात झाली. गुरुवारी इंग्रजी विषयाच्या पेपरदरम्यान भरारी पथकांनी परीक्षा केंद्रांवर धाडी घातल्या. या धाडीत पातूर येथील सावित्रीबाई फुले कनिष्ठ महाविद्यालयातील आणि अकोट येथील नरसिंग महाविद्यालयातील प्रत्येक एक अशा दोन कॉपीबहाद्दरांना रंगेहात पकडण्यात आले. भरारी पथकाने दोघांना निलंबित केले.बारावीच्या परीक्षेला गुरुवारपासून सुरुवात झाली असून, परीक्षा जिल्ह्यातून २६ हजार ९२0 विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत. जिल्ह्यातील ८३ केंद्रांवर परीक्षा सुरू झाली आहे. परीक्षा केंद्र आणि परिसरात गैरप्रकार रोखण्यासाठी शिक्षण विभागाने व्हिडिओ शुटिंग पथकांसह भरारी पथके नियुक्त केले आहेत. महिला भरारी पथकाने अधिव्याख्याता कविता बोरसे यांच्या नेतृत्वात अकोट येथील नरसिंग महाविद्यालयात धाड घातली. या ठिकाणी एका विद्यार्थ्यास कॉपी करताना पकडले. तसेच प्राचार्य डॉ. प्रकाश जाधव यांच्या नेतृत्वातील जिल्हा शैक्षणिक गुणवत्ता व व्यावसायिक विकास संस्थेच्या पथकाने पातूर येथील सावित्रीबाई फुले कनिष्ठ महाविद्यालयात धाड घालून एका विद्यार्थ्याने कॉपी केल्यामुळे निलंबित केले. २२ फेब्रुवारीला हिंदी विषयाचा पेपर होणार आहे.अर्धा तास आधी न आल्यास पेपर नाही!परीक्षा केंद्रावर अर्धा तास आधी येणाऱ्या विद्यार्थ्यांनाच प्रवेश देण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. परीक्षा सुरळीत आणि कॉपीमुक्त होण्यासाठी शिक्षण विभाग प्रयत्न करीत आहे. त्या दृष्टिकोनातूनच १0.३0 वाजतानंतर परीक्षा केंद्रावर येणाºया विद्यार्थ्यांना यंदा परीक्षेपासून मुकावे लागणार आहे. विद्यार्थी व पालकांची कोणतीही सबब ऐकून घेतली जाणार नाही. सकाळी ११ ते २ या वेळत पेपर होणार असल्याने, विद्यार्थ्यांनी अर्धा तास आधीच परीक्षा केंद्रावर पोहोचावे, असे आवाहन शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद, सहायक शिक्षण उपनिरीक्षक आत्माराम राठोड यांनी केले आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाexamपरीक्षा