शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती विभागात १२४९ शाळाबाहय़ मुले!

By admin | Updated: February 6, 2016 00:14 IST

शाळाबाहय़ मुले शिक्षण प्रवाहापासून दूर.

नितीन गव्हाळे/ अकोला: शिक्षण हक्क कायद्याची अंमलबजावणी सुरू होऊन दोन वर्षे उलटली, तरी अमरावती विभागामध्ये अद्यापही शाळाबाहय़ मुले दिसून येतात. जानेवारी महिन्यात शिक्षण विभागाने केलेल्या सर्वेक्षणादरम्यान अमरावती विभागातील पाचही जिल्हय़ांमध्ये १२४९ शाळाबाहय़ मुले दिसून आली; परंतु त्यापैकी शेकडो मुले शिक्षणापासून वंचित असल्याची वस्तुस्थिती आहे. बसस्थानक, रेल्वे स्टेशन, गलिच्छ वस्ती आदी परिसरामध्ये शेकडो मुले-मुली भीक मागताना; चहाटपरी, दुकानांवर मजुरी करताना दिसून येतात. गरिबीमुळे त्यांना शिक्षण घेता येत नाही. अशा मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी राज्य शासनाकडून दोन वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. शिक्षण हक्क कायद्यातील तरतुदीनुसार ६ ते १४ वयोगटातील शाळाबाहय़ मुलांचा शोध घेऊन, त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी जानेवारी महिन्यात शिक्षण विभागाच्या वतीने सामाजिक संघटनांची मदत घेऊन बसस्थानक, रेल्वेस्थानक, गलिच्छ वस्ती परिसरात सर्वेक्षण घेण्यात आले. सर्वेक्षणादरम्यान अमरावती विभागातील पाचही जिल्हय़ांमध्ये १२४९ मुले-मुली सापडल्या; त्यापैकी पाचशे-सहाशे मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यात शिक्षण विभागाला यश आले. उर्वरित मुले अद्यापही शिक्षणापासून दूर असल्याची वस्तुस्थिती आहे. शाळाबाहय़ मुलांचा शोध घेऊनही उपयोग होत नाही. शाळाबाहय़ मुलांची संख्या कागदावरच असल्याने, प्रत्यक्ष ही मुले शिक्षणाच्या प्रवाहापासून वंचित राहतात. त्यामुळे शिक्षण हक्क कायद्याची अंमलबजावणी केवळ कागदी घोडे नाचविण्यापुरतीच होत असल्याचे स्पष्ट होते. अमरावती विभागातील शाळाबाहय़ मुलेजिल्हा             मुले               मुलीअकोला-           ८७                   ८९अमरावती-     १२९                  १३८वाशिम-         १२७                  ११६बुलडाणा-       १३२                  १२१यवतमाळ-     १५९                  १५१......................एकूण-           ६३४                  ६१५