शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

१२0 कोटींचे उत्पन्न कागदावरच!

By admin | Updated: January 20, 2016 02:10 IST

अकोला महापालिकेत मालमत्ता मोजणीची माहिती धूळ खात.

आशीष गावंडे / अकोला: मालमत्ता कर वसुलीच्या माध्यमातून महापालिकेला १२0 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवून देण्याचा गवगवा करणार्‍या तत्कालीन सहायक आयुक्तांच्या कार्यशैलीमुळे प्रशासनाची कोंडी झाली आहे. मनपाच्या तब्बल ५00 कर्मचार्‍यांचा फौजफाटा सोबत घेऊन ९0 हजार मालमत्तांचे पुनर्मूल्यांकन करणार्‍या संबंधित अधिकार्‍याने डिसेंबर महिना उजाडेपर्यंत मालमत्ता मोजणीची माहिती संगणकात संकलित करण्यास दिरंगाई केल्याचा फटका प्रशासनाला बसला असून, १२0 कोटींचे उत्पन्न तर सोडाच, आता जुन्या दरानुसार नोटीस जारी करण्याची वेळ प्रशासनावर आली. मनपाच्या मालमत्ता कर विभागामार्फत मार्च महिन्यापर्यंत २८ कोटींची वसुली केली जाणार असून, यामध्ये सहा कोटी रुपयांची थकबाकी आहे. तत्पूर्वी, शहरातील मालमत्तांचे नव्याने पुनर्मूल्यांकन केल्यास मनपाच्या तिजोरीत किमान १२0 कोटींचे उत्पन्न प्राप्त होणार असल्याची सबब समोर करीत मनपाच्या तत्कालीन सहायक आयुक्त माधुरी मडावी यांनी एप्रिल २0१५ मध्ये पुनर्मूल्यांकन मोहिमेला सुरुवात केली. ही मोहीम झोननिहाय पूर्ण करण्यासाठी संबंधित क्षेत्रीय अधिकारी, मालमत्ता विभाग, नगर रचना विभाग, बांधकाम विभागातील कर्मचार्‍यांसह मनपा शिक्षक व सुरक्षा रक्षक अशा सुमारे ५00 कर्मचार्‍यांचा समावेश करण्यात आला. टप्प्याटप्प्याने झोननिहाय मोजणी करीत असताना, अर्थातच त्याचवेळी मोजणी केलेल्या मालमत्तांची माहिती संगणकात संकलित करणे अपेक्षित होते. तसे न करता ९0 हजार मालमत्तांचे दस्तावेज एकाच वेळी मनपात जमा करण्यात आले. या कामासाठी चक्क सात महिन्यांचा अवधी लागला.