शहरं
Join us  
Trending Stories
1
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
2
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
3
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
4
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
5
घरात लग्नाची तयारी, होणाऱ्या पतीसोबत करायचं होतं फोटोशूट पण तरुणीसोबत घडलं आक्रित अन्...
6
बाजाराचा २ महिन्यांचा उच्चांक! गुंतवणूकदारांची १.२३ लाख कोटींची कमाई, 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर
7
पुढील माहिती मिळेपर्यंत नेपाळला जाऊ नका; सरकारने भारतीयांसाठी सूचना दिल्या
8
Nepal Protest : नेपाळमधील आंदोलनाचा सीमेवर परिणाम, सीमेवर परिस्थिती तणावपूर्ण; भारतीय पर्यटकांना रोखले
9
जीएसटीचा 'सुतक'काळ...! शोरुममध्ये कधी नव्हे तो शुकशुकाट...; लोक येतायत अन् विचारून जातायत...
10
दुचाकी दुर्लक्षितच राहिल्या...! जिव्हाळ्याची हिरो स्प्लेंडर ८ हजारांनी कमी होणार, एचएफ डीलक्स ६, एक्स्ट्रीम...
11
९२% नं आपटून १ रुपयांवर आला 'हा' शेअर; आता कंपनी देणार एकावर १० बोनस शेअर्स
12
महापौर ते थेट नेपाळ पंतप्रधानपदाच्या शर्यतीत समोर आलेले बालेन शाह यांची संपत्ती किती?
13
५० लाखांचे गृहकर्ज होईल व्याजमुक्त! फक्त ₹५,०५० ची गुंतवणूक वाचवेल लाखो रुपयांचे व्याज
14
दृष्टिहीन वडिलांसोबत भीक मागायची लेक; अभ्यासात हुशार, परिस्थितीवर मात करत बदललं नशीब
15
करिश्माच्या मुलांचा सावत्र आईवर फसवणुकीचा आरोप, संजय कपूरच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीमध्ये मागितला वाटा
16
सामान्य चार्जिंग आणि वायरलेस चार्जिंगमध्ये काय फरक आहे? जाणून घ्या...
17
'ब्रिक्स देश अमेरिकेसाठी पिशाच्च; लवकरच युती तुटणार', पीटर नवारो यांनी पुन्हा गरळ ओकली
18
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात ठेवलेल्या नैवेद्याला कावळा शिवत नाही? नक्कीच हातून घडत असणार 'या' ५ चुका!
19
₹२ चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांच्या उड्या; ४३ दिवसांपासून सातत्यानं अपर सर्किट, तुमच्याकडे आहे?
20
"ती स्वभावाने खूप शांत आहे..."; अजित पवारांमुळे चर्चेत आलेल्या IPS अंजना कृष्णाचे वडील काय म्हणाले?

१२ पूल धोकादायक!

By admin | Updated: August 4, 2016 01:48 IST

कामे प्रलंबित; नागरिकांची गैरसोय; अपघाताच्या घटनांना निमंत्रण.

संतोष येलकर अकोला, दि. ३- जिल्हय़ातील प्रमुख जिल्हामार्ग आणि राज्य मार्गावरील अनेक ठिकाणच्या पुलांची दुरवस्था झाली आहे. अनेक वर्षांपूर्वी बांधण्यात आलेले पूल शिकस्त झाले असून, पुलांची रुंदी कमी आहे. बहुतांश पुलांवर कठडे नाहीत. अतवृष्टी आणि नदी-नाल्यांना पूर आल्यास कमी उंची आणि अरुंद असलेल्या पुलांवरून पुराचे पाणी वाहते. त्यामुळे संबंधित मार्गावरील वाहतूक ठप्प होत असल्याने, नागरिकांची गैरसोय होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत जिल्हय़ात प्रमुख जिल्हामार्ग आणि राज्य मार्गावरील १२ पुलांची अवस्था धोकादायक आहे. पावसाळ्याच्या दिवसात नदी-नाल्यांना पूर आल्यास या कमकुवत पुलांवरील वाहतूक विस्कळीत होते. तसेच अरुंद पूल आणि कठडे नसल्याने वाहनधारक आणि नागरिकांना जीव मुठीत घेऊनच पूर पार करावा लागत आहे. त्यामुळे जिल्हय़ातील धोकायदायक पूल अपघाताच्या प्रसंगांना निमंत्रण देणारे ठरत आहेत. नागरिकांसाठी गैरसोयीचे आणि जीवघेण्या ठरणार्‍या पुलांच्या ठिकाणी नवीन पुलांची कामे मात्र रखडली आहेत.जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे माहितीच नाही! जिल्हा परिषद बांधकाम विभागांतर्गत जिल्हय़ातील ग्रामीण भागात रस्त्यांवर असलेले काही पूलदेखील शिकस्त झाले आहेत. त्यानुषंगाने धोकादायक असलेल्या पुलांसंबंधी माहितीसाठी बुधवारी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील संबंधित कर्मचार्‍यांशी संपर्क साधला असता, धोकादायक पुलांसंबंधी माहिती उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. यासंदर्भात कार्यकारी अभियंत्यासोबत संपर्क साधला असता, प्रतिसाद मिळाला नाही.पाच पुलांच्या कामांची निविदा प्रक्रिया; तीन पुलांच्या कामांना मंजुरी बाकी!जिल्हा मार्ग अंतर्गत उमरी-गुडधी-सांगळूद, वणी-कानशिवणी, म्हसांग-रामगाव-दहिगाव, हिंगणा-गोरेगाव-माझोड व भटोरी-मंगरुळ कांबे या पाच रस्त्यांवर नवीन पाच पुलांची कामे मंजूर असून, या कामांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत निविदा प्रक्रिया सुरू आहे. तर राज्य मार्गावरील हातरुण-निमकर्दा, पातुर्डा-उकळी-निंभोरा व आंबेटाकळी -बाश्रीटाकळी या तीन रस्त्यांवरील नवीन तीन पुलांची कामे प्रस्तावित करण्यात आली असून, या कामांसाठी शासनामार्फत मंजुरी प्राप्त होणे अद्याप बाकी आहे.असे आहेत मार्गनिहाय रस्त्यांवरील धोकादायक पूल!जिल्हय़ात राज्य मार्गावरील आकोट -अकोला, म्हैसांग-आसरा, आकोट -हिवरखेड, शेगाव-देवरी, हातरुण-निमकर्दा, पातुर्डा-उकळी-निंभोरा, आंबेटाकळी-बाश्रीटाकळी तसेच जिल्हा मार्गावरील उमरी -गुडधी-सांगळूद, वणी-कानशिवणी, म्हैसांग-रामगाव-दहिगाव, हिंगणा-गोरेगाव-माझोड व भटोरी-मंगरुळ कांबे इत्यादी १२ रस्त्यावरील १२ पुलांची अवस्था धोकादायक आहे.