शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

११० ‘बीएलओं’विरुद्ध फौजदारी कारवाई प्रस्तावित!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 13:31 IST

अकोला पश्चिम व अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघातील ११० मतदान केंद्रस्तरीय अधिकाºयांविरुद्ध (बीएलओ) फौजदारी कारवाई प्रस्तावित करण्यात आली.

ठळक मुद्देजिल्ह्यात १ सप्टेंबर ते ३१ आॅक्टोबर या कालावधीत मतदार नोंदणीची विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. ११० मतदान केंद्रस्तरीय अधिकाºयांनी (बीएलओ) मतदार नोंदणीचे काम अद्याप सुरू केले नाही.

अकोला : मतदार याद्यांच्या पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार नोंदणीच्या कामात दिरंगाई करणाऱ्या अकोला पश्चिम व अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघातील ११० मतदान केंद्रस्तरीय अधिकाºयांविरुद्ध (बीएलओ) फौजदारी कारवाई प्रस्तावित करण्यात आली असून, त्यादृष्टीने अकोला उपविभागीय अधिकारी (एसडीओ) कार्यालयामार्फत तयारी सुरू करण्यात आली आहे.निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे १ जानेवारी २०१९ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात १ सप्टेंबर ते ३१ आॅक्टोबर या कालावधीत मतदार नोंदणीची विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत वयाची १८ वर्षे पूर्ण झालेल्या नवीन मतदारांची मतदार यादीत नावे समाविष्ट करणे, मतदार यादीतून नाव वगळणे किंवा कमी करणे तसेच मतदारांच्या नावात, पत्त्यात किंवा इतर तपशिलामध्ये बदल करण्यासाठी मतदारांकडून विहित नमुन्यात अर्ज भरून घेण्याचे काम मतदान केंद्रस्तरीय अधिकाºयांमार्फत (बीएलओ) करण्यात येत आहे; परंतु अकोला पश्चिम व अकोला पूर्व या दोन विधानसभा मतदारसंघातील ११० मतदान केंद्रस्तरीय अधिकाºयांनी (बीएलओ) मतदार नोंदणीचे काम अद्याप सुरू केले नाही. मतदार नोंदणीसाठी बीएलओ रजिस्टर, मतदार याद्या इत्यादी साहित्य न स्वीकारता, मतदार नोंदणीचे काम सुरू केले नाही. त्यामुळे मतदार नोंदणीच्या कामात दिरंगाई करणाºया अकोला पश्चिम आणि अकोला पूर्व या दोन विधानसभा मतदारसंघातील ११० मतदान केंद्रस्तरीय अधिकाºयांविरुद्ध लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५० चे कलम ३२ नुसार फौजदारी कारवाई प्रस्तावित करण्यात आली असून, यासंदर्भात अकोला उपविभागीय अधिकारी कार्यालयामार्फत तयारी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे मतदार नोंदणीचे काम तातडीने सुरू न केल्यास अकोला पश्चिम व अकोला पश्चिम मतदारसंघातील संबंधित ‘बीएलओं’विरुद्ध फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे. त्यामध्ये शिक्षक आणि इतर विविध विभागातील कर्मचाºयांचा समावेश आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाElectionनिवडणूक