जिल्हा परिषदेच्या लाखपुरी व बपोरी आणि पंचायत समितीच्या लाखपुरी, ब्रम्ही खुर्द, माना व कानडी या जागांसाठी निवडणूक होत आहे. सोमवारी ५ जुलैला नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा अखेरचा दिवस असल्याने नामनिर्देशनपत्र दाखल करण्यासाठी एकच गर्दी केली. जिल्हा परिषदेच्या दोन जागांसाठी १० उमेदवारांचे ११, तर पंचायत समितीच्या ४ जागांसाठी २० उमेदवारांचे २१ अर्ज दाखल झाले, असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते यांनी दिली. मंगळवारी (दि. ६ जुलै) नामनिर्देशन पत्रांची छाननी होऊन ९ जुलैपर्यंत अपिलात जाता येईल व १२ जुलैला अपिलाचा निकाल समोर येईल. अपील नसेल, तर १२ व अपील असेल तर १४ जुलैपर्यंत उमेदवारी मागे घेता येईल. १९ जुलैला सकाळी ७.३० ते संध्याकाळी ५.३० पर्यंत मतदान घेण्यात येईल, २० जुलैला सकाळी १० वाजता मतमोजणी सुरू होऊन निवडणूक निकाल बाहेर येतील. या निवडणुकीत तिरंगी लढतीचे सध्याचे चित्र असले तरी याबाबतचे खरे चित्र १४ जुलैला स्पष्ट होईल.
फोटो :