शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

तर दोन अधिकार्‍यांसह ११ कर्मचार्‍यांवर फौजदारी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2017 01:06 IST

अकोला : शासनाच्या मालकीचा तब्बल २0 कोटी रुपयांचा ४0 हजार स्क्वेअर फुटाचा भूखंड भूमी अभिलेख विभागातील संगणकात ऑनलाइन नोंद घेऊन कागदोपत्री हडपण्याच्या प्रकरणात भूमी अभिलेख विभागातील दोन अधिकारी, ११ कर्मचारी व हे बनविण्यासाठी पैशाचा वाटप करणारा बडा व्यापारी व एक साथीदार, अशा एकूण १५ जणांवर फौजदारी कारवाई होणार असल्याचे संकेत पोलिसांकडून प्राप्त झाले आहेत.

ठळक मुद्देभूखंड घोटाळा प्रकरणबड्या व्यापार्‍यासह १५ जणांवर फौजदारीचे संकेत‘सीडीआर’मध्ये होणार खुलासा!

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शासनाच्या मालकीचा तब्बल २0 कोटी रुपयांचा ४0 हजार स्क्वेअर फुटाचा भूखंड भूमी अभिलेख विभागातील संगणकात ऑनलाइन नोंद घेऊन कागदोपत्री हडपण्याच्या प्रकरणात भूमी अभिलेख विभागातील दोन अधिकारी, ११ कर्मचारी व हे बनविण्यासाठी पैशाचा वाटप करणारा बडा व्यापारी व एक साथीदार, अशा एकूण १५ जणांवर फौजदारी कारवाई होणार असल्याचे संकेत पोलिसांकडून प्राप्त झाले आहेत.  अकोला शहरातील शिट नं. ३७ बी प्लॉट नं. १२१/१ व शिट नं. ३७ बी १२१/१ अ हे संतोषी माता मंदिरानजीकचे भूखंड शासनाच्या नावे आहेत. या भूखंडातील शिट नं. ३७ बी प्लॉट नं. १२१/‘पैकी’ असा शब्दप्रयोग करून तब्बल २0 कोटी रुपये किमतीचा ३ हजार ७१७.१७ चौरस मीटर भूखंडाचे हस्तलिखित दस्तावेज नसताना तालुका भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचार्‍यांच्या संगनमताने गजराज गुदडमल मारवाडी यांच्या नावे संगणकात ऑनलाइन नोंद घेण्यात आल्याचे प्रकरण ‘लोकमत’ने उघडकीस आणले. त्यानंतर या प्रकरणात सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात देण्यात आलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. या चौकशीत भूमी अभिलेख विभागात १ जानेवारी २0१५ ते ३१ डिसेंबर २0१५ या कालावधीत जे अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत होते, त्या सर्वांकडे संगणकाचा पासवर्ड आणि कोडवर्ड असल्याचे या अधिकारी व कर्मचार्‍यांनी सांगितले आहे. एवढेच नव्हे तर अधिकारी व कर्मचारी एकमेकांवर हे प्रकरण ढकलत असल्याने यामध्ये कोडवर्ड आणि पासवर्ड ज्या ११ कर्मचारी व २ अधिकार्‍यांकडे होते ते आणि बाहेरील बडा व्यापारी व त्याचा साथीदार यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

‘सीडीआर’मध्ये होणार खुलासा!भूमी अभिलेख विभागातील अधिकारी आणि संशयित कर्मचार्‍यांचा मोबाइल क्रमांकाचा कॉल डाटा रेकॉर्ड (सीडीआर) काढण्यात येणार असून, यामध्ये सदर बडा व्यापारी कोण आहे? याचा खुलासा होणार असल्याची माहिती आहे. भूमी अभिलेख विभागातील त्या पाच ते सहा अधिकारी आणि कर्मचार्‍यांचा संपर्क कुणाशी अधिक होता, याचा शोध घेण्यात येणार आहे. हा भूखंड ऑनलाइन नोंद घेऊन हडप करण्यासाठी ज्या सूत्रधाराने हे प्रकरण केले, त्याचेही नावे सीडीआरनंतर उघड होणार असल्याने या कर्मचार्‍यांचे तातडीने सीडीआर काढण्याची मागणी होत आहे.