शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
5
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
6
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
7
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
8
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
10
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
11
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
12
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
13
आयोग नव्हे, मतदारच राजा !
14
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
15
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
16
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
17
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
18
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
19
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
20
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले

मध्य प्रदेशातील १०८६ मजूर विशेष रेल्वेने जबलपूरकडे रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2020 10:16 IST

जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी अकोला रेल्वे स्टेशन येथे हिरवा कंदील दाखवून ही गाडी रवाना केली.

अकोला : अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशिम व बुलडाणा या जिल्ह्यांतील १,०८६ स्थलांतरित श्रमिक मजूर गुरुवारी विशेष रेल्वेगाडीने अकोला येथून जबलपूरकडे रवाना झाले. आज रात्री ८ वाजता जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी अकोला रेल्वे स्टेशन येथे हिरवा कंदील दाखवून ही गाडी रवाना केली.यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्यासमवेत पोलीस अधीक्षक अमोघ गावकर, अमरावती येथील उपायुक्त प्रमोद देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपविभागीय अधिकारी डॉ. नीलेश अपार, उपजिल्हाधिकारी रोहयो बाबासाहेब गाढवे, तहसीलदार विजय लोखंडे, रेल्वेचे मुख्य वाणिज्य निरीक्षक अकोला मो. यस्मिन अन्सारी उपस्थित होते. यावेळी विशेष श्रमिक एक्स्प्रेस गाडी न ०१९२० या गाडीने हे श्रमिक रवाना झाले. त्यात अकोला जिल्ह्यातील १६०, अमरावती जिल्ह्यातील ३३६, वाशिम जिल्ह्यातील ४४, बुलडाणा जिल्ह्यातील २४३ व यवतमाळ येथील ३०३ प्रवासी होते. या सर्व प्रवाशांना प्रशासनातर्फे जेवण, पाणी पुरविण्यात आले.शुक्रवार, ८ मे रोजी अकोला ते भोपाल या मार्गावर दुसरी श्रमिक रेल्वे जाणार असून, ही गाडी अकोला येथून रात्री ८.३० वाजता रवाना होणार आहे. या गाडीतही अकोला, अमरावती, यवतमाळ, बुलडाणा व वाशिम येथील परप्रांतीय श्रमिकांचा समावेश असेल, असे नोडल अधिकारी बाबासाहेब गाढवे यांनी कळविले आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Railway Stationअकोला रेल्वे स्थानकLabourकामगारjabalpur-pcजबलपुर