शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
5
१२४ वर्षांनंतर अक्षय तृतीया-चतुर्थी-रोहिणी नक्षत्र अन् बुधवारचा दुर्मीळ योग!
6
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
7
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
8
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
9
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
10
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
11
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
12
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
13
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
14
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
15
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
16
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
17
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
18
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
19
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
20
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...

१०८ रुग्णवाहिकेने सहा वर्षात वाचवले ४६ लाख रुग्णांचे प्राण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 12:20 IST

यामध्ये सर्वाधिक ९ लाख ५४ हजार २३ रुग्ण पुणे विभागातील आहेत.

अकोला : सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका राज्यभरात अत्यावश्यक सेवा देत आहे. गत सहा वर्षात रुग्णवाहिकेने राज्यभरातील ४६ लाख ६६ हजार १८४ रुग्णांचे प्राण वाचवले आहेत. यामध्ये सर्वाधिक ९ लाख ५४ हजार २३ रुग्ण पुणे विभागातील आहेत.अ‍ॅडव्हान्स लाइफ सपोर्ट आणि बेसिक लाइफ सर्पोट अशा दोन प्रकारच्या रुग्णवाहिका २०१४ पासून राज्यात रुग्णसेवा देत आहेत. महामार्गावरील अपघात असो, वा इतर घटनांमध्ये गंभीर झालेल्या रुग्णांना तातडीचा उपचार मिळावा, म्हणून १०८ क्रामांकाची रुग्णसेवा अत्यावश्यक सेवा देत आहे. गत सहा वर्षात अनेक अडचणींचा सामना करत रुग्णवाहिकेने गोल्डन अवर साधत लाखो रुग्णांचा जीव वाचविला. रुग्णसेवेसाठी राज्यभरात १०८ क्रमांकाच्या ९३७ रुग्णवाहिका रुग्णसेवा देत आहेत. यामध्ये २३३ अ‍ॅडव्हान्स लाइफ सपोर्ट, तर ७०४ बेसिक लाइफ सपाोर्ट रुग्णावाहिकांचा समावेश आहे. यासाठी राज्यभरात ५ हजार डॉक्टर, चालक आणि व्यवस्थापक कार्यरत आहेत.विभागनिहाय स्थितीविभाग - रुग्ण संख्याकोल्हापूर - ४,४९१८५पुणे - ९,५४०२३नाशिक - ६,४३७२८नागपूर - ५,९५१८१औरंगाबाद - ४, ३३८५३लातूर - ४, ४२१७४ठाणे - ६,२७३८७अकोला जिल्ह्याची स्थिती (गत ६ वर्षातील स्थिती)

  • सहा वर्षात ८१ हजार ७१६ रुग्णांना अत्यावश्यक सेवा
  • अपघाती रुग्ण ५ हजार २५४
  • जळीत रुग्ण ३५४
  • हृदयविकार रुग्ण ९४
  • विष प्राशन केलेल्या ३६५३ रुग्णांना वेळेत उपचार
  • आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या ९९ रुग्णांना वेळत रुग्णालयात पोहोचविले.

रुग्ण रेफरसाठी रुग्णवाहिकेचा जातो वेळअनेक ठिकाणी रस्त्यांची गंभीर समस्या असल्याने १०८ रुग्णावाहिकांमध्ये मेंटन्सची समस्या येते. त्यामुळे पर्यायी व्यवस्था म्हणून दुसरी रुग्णवाहिका तत्पर असणे आवश्यक आहे; परंतु बहुतांश ठिकाणी या रुग्णवाहिकेचा उपयोग शहरांतर्गत रुग्णांना रेफर करण्यासाठीच होतो. परिणामी अनेकदा रुग्णवाहिका रुग्णांपर्यंत पोहचू शकत नाही.गत सहा वर्षात राज्यातील १०८ क्रमांकाच्या रुग्णावाहिकेने ४६ लाखांवर रुग्णांना सेवा देत त्यांचे प्राण वाचविले आहेत. ही सेवा प्रामुख्याने महामार्गावरील अपघातांसह इतर आपत्कालीन परिस्थितीसाठी आहे. अशाच अत्यावश्यक कारणांसाठी या रुग्णवाहिकांचा उपयोग झाल्यास गोल्डन अवर साधून अनेकांचे प्राण वाचविणे शक्य होईल.- डॉ. दीपक कुमार उके, आॅपरेशन हेड, पूर्व महाराष्ट्र, राज्य आप्तकालीन वैद्यकीय सेवा

 

टॅग्स :Akolaअकोला